आजवर तुम्ही अनेक अप्रतिम रॉसॉर्ट्स पाहिले असतील मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका रिसॉर्टविषयी सांगणार आहोत जे जगात इतर कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हे अनोखं रिसॉर्ट दुबईमध्ये बांधण्यात येत आहे जे जगातील पहिले हवेत तरंगणारे रिसॉर्ट असणार आहे. याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. चला या रिसॉर्टमधील काही खास सुविधांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Mid Air Resort: 'या' देशात बनणार जगातील एकमेव हवेत तरंगणार रिसॉर्ट, Luxurious सुविधा वाचून थक्क व्हाल

आपल्या आधुनिकतेसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या दुबईमध्ये आता एक नवीन रिसॉर्ट बांधण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. दुबईमध्ये एक आलीशान हवेतील रिसॉर्ट उभारण्यात येणार आहे

माहितीनुसार, दुबईतील जबील पार्क मध्ये 'थर्मे दुबई' नावाचे जगातील सर्वाधिक उंच आणि वेल-बिइंग रिसॉर्ट उभारले जात आहे. या भव्य रिसॉर्टची उंची 100 मी इतकी असणार आहे

हे अनोखे रॉसॉर्ट 500 हजार स्क्वेअरफूट एरियात बांधले जाणार आहे. पर्यावरणाच्या स्थिरतेचा विचार करून आणि दुबईकच्या लोकांना एक वेगळा अनुभव मिळावा म्हणून हे रॉसॉर्ट तयार केले जात आहे

या रिसॉर्टमध्ये एक इंटरेक्टिव्ह गार्डनसुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे. भविष्यातील या रिसॉर्टची झलक दाखवण्यासाठी एक 3D व्हिडिओ तयार करण्यात आला आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे '

सरकारने या नवीन लँडमार्कच्या विकासासाठी 47 अब्ज रुपये दिले आहेत. रिसॉर्टच्या इंटरएक्टिव्ह पार्कमध्ये जगातील सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन तयार केले जाणार आहे. हे रिसॉर्ट जगभरातील पर्यटकांसाठी खुले केले जाईल






