हायपोथायरॉइडिझम आणि अॅनिमिया दोघांचाही ताण वाढत आहे (फोटो सौजन्य - iStock)
भारतामध्ये ४.२ कोटी लोकांना थायरॉइडचा त्रास आहे, ज्यामध्ये हायपोथायरॉइडिझमचे प्रमाण सर्वाधिक असून दर १० प्रौढ व्यक्तींमधील १ व्यक्ती या आजाराने प्रभावित आहे . हायपरथायरॉईडिझमग्रस्त व्यक्तींपैकी ४१.८ टक्के व्यक्ती या बरेचदा हायपरथायरॉइडिझमचे पहिले लक्षण असणाऱ्या अॅनिमियाने प्रभावित असल्याचे दिसतेi. यंदाच्या जागतिक थायरॉइड जागरुकता महिन्यामध्ये लोकांना या दुहेरी आव्हानाची आठवण करून देणे महत्त्वाचे आहे, ज्यावर इलाज न झाल्यास व्यक्तीच्या एकूणच उत्पादनक्षमतेवर आणि जीवनमानाच्या दर्जावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
काय आहेत लक्षणे
रक्तातील तांबड्या पेशींची संख्या सर्वसामान्य आकड्यापेक्षा कमी भरणे हे व्यवच्छेदक लक्षण असणारा अॅनिमिया बरेचदा हायपोथायरॉइडिझमच्या सोबत शरीरात वास्तव्यास येतो. हायपोथायरॉइडिझममध्ये तुमच्या मानेमध्ये स्थित फुलपाखराच्या आकाराची थायरॉइड ग्रंथी पुरेशा प्रमाणात थायरॉइड संप्रेरके निर्माण करू शकत नाही.
ही संप्रेरके अत्यंत महत्त्वाची असतात, कारण ती तुमच्या शरीराच्या चयापचय यंत्रणेच नियमन करतात आणि याचा तुमचे शरीर ऊर्जेचा कशाप्रकारे वापर करते यावर होतो. या स्थितींची लक्षणे एकमेकांना झाकणारी असू शकतात, विशेषत: हिवाळ्यामध्ये त्वचा एरवीही फिकुटलेली असल्याने अॅनिमियाची लक्षणे झाकली जाऊ शकतात. असे असूनही, बरेचदा त्याकडे दुर्लक्ष होते.
महिलांमध्ये पुरुषांच्या तीनपट प्रमाण
हिवाळ्यामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी व तापमान नियमित करण्यासाठी शरीराकडून जादा थायरॉइड संप्रेरकांची मागणी केली जाते, ज्यामुळे वजन वाढणे, थकवा, नैराश्य, कोरडी आणि खरबरीत त्वचा व केस, थंडी सहन करणे कठीण जाणे व हातांमध्ये झिणझिण्या येणे यांसारखी सर्वसामान्य लक्षणे अधिकच तीव्रतेने जाणवू शकतात. स्त्रियांना हायपरथायरॉइझमची शक्यता पुरुषांच्या तुलनेत तीन पट असते – वयोवृद्ध माणसे हा लोकसंख्यागटातही या स्थितीचा विशेषत्वाने प्रादुर्भाव असल्याचे आढळते
पुरुषांनी थायरॉईड चाचणी करावी का? या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका
हे दोन आजार एकमेकांशी कशाप्रकारे जोडलेले आहेत?
थायरॉइडची पातळी खाली गेली की तांबड्या रक्तपेशी बनण्याची प्रक्रिया मंदावते, हायपोथायरॉइडिझम किंवा होशिमोटोज थायरॉयडायटिससारख्या थायरॉइड आजारांच्या परिणामी ही प्रक्रिया अधिकच गुंतागूंतीची बनते. या स्थितींच्या परिणामी बरेचदा बी१२ या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळेही तांबड्या रक्तपेशी बनण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यात थायरॉइडच्या खालावलेल्या पातळीचा लोह खनिज रक्तात शोषल्या जाणाऱ्या क्रियेत हस्तक्षेप होतो, ज्यातून चयापचयाशी निगडित विविध प्रक्रियांमध्ये व्यत्यय येतो.
दोन्ही समस्यांपैकी कोणत्याही एका समस्येवर उपचार न झाल्यास हे प्रश्न अधिकच गंभीर बनू शकतात आणि त्यातून या स्थितीचे व्यवस्थापन अधिकच कठीण बनू शकते. या दोन आजारांतील या परस्परसंबंधाविषयी जागरुकता निर्माण करण वेळेवर व अचून निदान होण्यासाठी गरजेचे आहेच, पण रुग्णांना योग्य देखभाल व उपचार मिळावेत याची खातरजमा करण्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे.
काय सांगतात तज्ज्ञ
अबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स हेड डॉ. रोहिता शेट्टी म्हणाल्या, “हायपोथायरॉइडिझम आणि अॅनिमिया या भारतातील लक्षणीय आरोग्यसमस्या आहेत, मात्र वेळेवर निदान व सातत्यपूर्ण उपचार यांच्या मदतीने त्यांचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य आहे. अधिकाधिक लोकांना या दोन स्थितींमधील संबंधाविषयी शिक्षित करणे व लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तत्परतेने वैद्यकीय सल्ला घेण्यास प्रोत्साहित करणे हा या समस्येवरील महत्वाचा उपाय आहे. उदाहरणार्थ, तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अगदी उन्हाळ्यातही थंडी वाजत असेल किंवा एखादा मित्र-मैत्रिण कधी न जाणाऱ्या थकव्याची तक्रार करत असेल तर त्यांना डॉक्टरकडे जाण्यासाठी आणि तपासणी करून घेण्यासाठी प्रोत्साहन द्या.”
कसे आहे प्रमाण जाणून घ्या
या मुद्द्यामध्ये भर टाकत करुणा हॉस्पिटल, भक्तीवेदांत हॉस्पिटल, मुंबई येथील कन्सल्टन्ट एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. अमेय जोशी म्हणाले, “आज, हायपोथायरॉइडिझम आणि अॅनिमिया या दोन्ही आजारांचा ताण वाढत आहे. उदाहरणार्थ, १५ ते ४९ वर्षे वयोगटीत स्त्रियांमधील अॅनिमियाचे प्रमाण २०१५-१६ मध्ये ५३ टक्के होते, ते वाढून २०१९-२०२१ मध्ये ५७ टक्के झाले आहे. लोकांनी या दोन स्थितींमधील नाते समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे निदानास मदत होईल व सुयोग्य सल्ला व उपचारांची हमी मिळू शकेल.”
थॅलॅसेमिया आणि लोहाच्या कमतरतेचा ऍनिमियामधील फरक, जाणून तज्ज्ञांचे मत
कोणी आणि का चाचणी करावी
पुढील उच्च धोका गटामधील लोकांनी पुढील स्थितींची शक्यता तपासण्यासाठी नियमितपणे चाचणी करून घ्यायला हवी:
निदान हीच चांगल्या व्यवस्थापनाची गुरुकिल्ली
इथे आपल्या आरोग्याविषयी दक्ष राहणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. लवकरात लवकर निदान होणे व उपचार मिळणे यामुळे प्रचंड फरक पडू शकतो. ही लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तींनी चाचण्या करून घेण्याचे पुढचे पाऊल उचलण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत केली पाहिजे. या चाचण्यांमध्ये थायरॉइड फंक्शन चाचणी किंवा अॅनिमियासाठी संपूर्ण ब्लड काऊंट तपासणे व फेरिटीन, बी१२ जीवनसत्व आणि फोलेटची पातळी यांसारखे मापदंड तपासण्याचा समावेश होऊ शकतो. तेव्हा प्रत्येक दिवशी अधिक दर्जेदार जीवन जगण्यासाठी आपल्या आयुष्याची सूत्रे आपल्या हातात घ्या!