लिव्हर कुजल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
लिव्हर खराब होण्याची कारणे?
लिव्हर खराब झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
लिव्हरच्या कार्यात अडथळे का निर्माण होतात?
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरातील सर्वच लहान मोठे अवयव निरोगी असणे फार महत्वाचे आहे. त्यातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीरासाठी पन्नास पेक्षा जास्त कामे करते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे, अन्नपदार्थ पचन करणे, रक्तशुद्ध करणे यांसारखी असंख्य कामे लिव्हर करते. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लिव्हरच्या कार्यात अनेक अडचणी निर्माण होतात. लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी साचून राहण्यास सुरुवात झाल्यानंतर फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सोरायसिससारखे गंभीर आजार होऊ शकतात. दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे, जंक फूडचे अतिसेवन, दारूचे अतिसेवन इत्यादी गोष्टी लिव्हरसाठी अतिशय घातक ठरतात. लिव्हरच्या आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)
वाढत्या वयानुसार हँगओव्हरचा त्रास का वाढतो? संशोधनातून समोर आलं मूळ कारणं
लिव्हरच्या आजारांना सायलेंट किलर आजार असे सुद्धा म्हणतात. लिव्हर कॅन्सर किंवा लिव्हर आतून कुजल्यानंतर लवकर लक्षणे दिसत नाही. हळूहळू शरीरात अनेक बदल दिसू लागतात. बऱ्याचदा या बदलांकडे गांभीयाने लक्ष दिले जात नाही. सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या लक्षणांमुळे कालांतराने गंभीर आजारांची शरीराला लागण होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हर आतून कुजल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे.
चेहऱ्यावर अचानक वाढलेल्या पिवळेपणाकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. लिव्हरचे आजार झाल्यानंतर रक्तात बिलीरुबिन नावाचे द्रव जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे त्वचा आणि नख पिवळी पडतात. कावीळ झाल्यानंतर सुद्धा त्वचा खूप जास्त पिवळी पडते. लिव्हर खराब झाल्यानंतर दिसून येणारे पहिले लक्षण म्हणजे त्वचा पिवळी पडणे.
लिव्हरच्या आजरांची लागण झाल्यानंतर किंवा लिव्हर आतून कुजल्यानंतर अंगाला खूप जास्त खाज येते. लिव्हरमधील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी लिव्हरमध्ये तसेच साचून राहतात, ज्याच्या परिणामामुळे अंगाला खूप जास्त खाज येते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी रक्तवाहिन्यांमध्ये तसेच साचून राहतात.
लिव्हर खराब झाल्यानंतर किंवा फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर शरीराच्या आतील अवयवांना सूज येते. याशिवाय पोटात खूप जास्त तीव्र वेदना होणे, पोट फुगणे, पोट जड झाल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. लिव्हर खराब झाल्यानंतर रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो, अल्ब्युमिनचं उत्पादन कमी होऊन जाते. रक्तवाहिन्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे शरीराच्या आतील अवयवांना सूज येते.






