दुपारच्या झोपेमुळे शरीरात वाढतील गंभीर आजार!
दुपारच्या वेळी पोटभर जेवण केल्यानंतर सगळ्यांचं झोप येते. सकाळी उठून सतत काम केल्यानंतर शरीर थकून जाते. अशावेळी दुपारची झोप अतिशय महत्वाची वाटते. तर काही लोक ऑफिसच्या कामातून थोडासा वेळ काढत छोटीशी झोप काढतात. झोपल्यामुळे थकलेल्या शरीराला आराम मिळतो. दुपारी थोडावेळ आराम केल्यानंतर खूप फ्रेश आणि उत्साही वाटते. फ्रेश होऊन काम करताना अनेक वेगळाच आनंद मनात असतो. पण दुपारच्या वेळी सुखाची झोप घेणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या ताज्या रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, दुपारच्या वेळी झोप घेणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीराला आजारांची लागण होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)
दुपारी किंवा दिवसभरात सतत झोपून राहिल्यामुळे हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर आणि मेटाबॉलिक सिंड्रोम इत्यादी गंभीर आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. हे आजार झाल्यानंतर शरीर बिघडून जाते. तसेच दुपारी जास्त वेळ झोपल्यामुळे रात्रीच्या वेळी लवकर झोप येत नाही. झोपेचे चक्र बिघडल्यानंतर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा अनेक गंभीर परिणाम होतात. अभ्यासकांनी सांगितल्यानुसार, झोपेची वेळी न झोपता ती झोप रात्री भरून काढली पाहिजे. कारण दुपारच्या वेळी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपल्यास शरीराची एनर्जी आणि मेंदूची सक्रियता पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे दुपारी कमीत कमी वेळ झोपावे.
आपल्यातील अनेकांना दुपारच्या वेळी झोपण्याची सवय असते. झोपल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. पण या झोपेमुळे हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. झोपून उठल्यानंतर अचानकपणे शरीराचा रक्तदाब वाढतो. तसेच हृदयाचे ठोके सुद्धा वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दुपारच्या वेळी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपू नये. यामुळे आरोग्याला हानी पोहचते.
दुपारी झोपल्यामुळे मेटाबॉलिज्म परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे शरीराची ऊर्जा कमी होऊन जाते. याशिवाय रिसर्चमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, दुपारच्या वेळी नियमित झोपणाऱ्यामध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू शकतात. तसेच शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. शरीरावर जमा झालेल्या अतिरिक्त चरबीमुळे शरीरात मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या वाढू लागतात.