AGEasy आणि वेलबीइंग न्यूट्रिशनने सादर केली खास ज्येष्ठांसाठी 'गट केअर' श्रेणी
अंतरा सीनियर केअरच्या अंतर्गत येणाऱ्या, भारतातील सर्वात सर्वसमावेशक आणि एकात्मिक ज्येष्ठ नागरिक सेवा प्रणाली असलेल्या AGEasy या ग्राहक उत्पादनांच्या ब्रँडने, आज क्लीन-लेबल, विज्ञान-आधारित न्यूट्रास्युटिकल्समधील अग्रेसर वेलबीइंग न्यूट्रिशनच्या भागीदारीत विकसित केलेल्या आपल्या विशेष ‘गट केअर श्रेणी’च्या सुरुवातीची घोषणा केली. (फोटो सौजन्य – istock)
ठाण्यात जीबीएस व्हायरसचा शिरकाव! आरोग्यासंबंधित ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला
हा नवीन पोर्टफोलिओ वृद्धत्वाच्या सर्वात दुर्लक्षित आव्हानांपैकी एक असलेल्या, म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांच्या आतड्यांमधील शारीरिक बदलांना सामोरे जाण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतात आतड्यांच्या समस्या सामान्य असल्या तरी, ज्येष्ठ नागरिकांवर त्यांचा परिणाम अधिक गुंतागुंतीचा असतो. अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, शहरी भागातील 10 पैकी 4 ज्येष्ठ नागरिकांना पचनाच्या त्रास सतत होतो, ज्यात बद्धकोष्ठता, IBS आणि IBD यांसारख्या समस्या प्रमुख आहेत. शिवाय, आकडेवारी दर्शवते की जवळपास 50% ज्येष्ठ नागरिक या समस्यांवर उपचारांसाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत. असे असूनही, बाजारातील बहुतेक आतड्यांच्या आरोग्याची उत्पादने सामान्य लोकांसाठी तयार केली जातात आणि वयानुसार होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करतात, जसे की:
• मंद पचनक्रिया
• आतड्यांमधील सूक्ष्मजीवांमध्ये बदल
• जास्त प्रमाणात औषध घेणे
• डायजेस्टिव एन्झाइमची क्रियाशीलता कमी होणे
या घटकांमुळे वाढत्या वयात पचनक्रिया अधिक संवेदनशील बनते, ज्यामुळे वारंवार अस्वस्थता वाटत राहते. वृद्धांसाठी सुरुवातीपासून तयार केलेल्या आतड्यांच्या आरोग्यासाठीच्या उत्पादनांची गरज लक्षात येते.
ही गरज ओळखून, AGEasy आणि वेलबिइंग न्युट्रिशन यांनी संयुक्तपणे वृद्धांसाठी विशेष आतड्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी उत्पादनांची श्रेणी तयार केली आहे. यामध्ये वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित घटकांचा वापर केला आहे आणि ही उत्पादने पचायला सोपी, सेवन करायला सुलभ आहेत आणि सध्या सुरू असलेल्या औषधोपचारांसोबतही वापरण्यासाठी योग्य आहेत*. सामान्य औषधे वापरण्याऐवजी, ही श्रेणी वृद्धांच्या शारीरिक रचनेचा विचार करून खास तयार करण्यात आली आहे. हे पोषण विज्ञानाला नैसर्गिक घटकांसोबत एकत्र करून पचनसंस्थेचे उत्तम कार्य आणि दैनंदिन आरामास मदत करते.
अंतरा असिस्टेड केयर सर्व्हिसेसचे CEO इशान खन्ना म्हणाले, “ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी आतड्यांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून येते की ते प्रतिकारशक्ती, दाह, चयापचय मापदंड आणि अगदी संज्ञानात्मक कार्यावरही परिणाम करते. AGEasy ला ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांची असलेली समज आणि वेलबीइंग न्यूट्रिशनच्या वैज्ञानिक अचूकतेच्या आधारावर, आम्ही अशी उत्पादनांची श्रेणी तयार केली आहे जी वाढत्या वयानुसार आतड्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करते. AGEasy गट केअर श्रेणी आम्लपित्त, बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि संपूर्ण पचनसंस्थेच्या संतुलनासारख्या समस्यांसाठी शाश्वत आणि विश्वसनीय आधार प्रदान करते. AGEasy मध्ये, आमचे ध्येय आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतःची काळजी घेणे अधिक प्रभावी आणि आनंददायी बनते.”
वेलबिइंग न्युट्रिशनचे अध्यक्ष आणि CEO अवनिश छाब्रिया म्हणाले: “हे सहकार्य प्रत्येक वयोगटासाठी स्वच्छ, संशोधनावर आधारित पोषण सुलभ बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करते. ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा गोळ्या घेण्याचा कंटाळा, गिळण्यास त्रास आणि पोषक तत्वांचे शोषण कमी होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. आमची उत्पादने सर्वोत्तम शोषण आणि वापराच्या सुलभतेसाठी विकसित केली गेली आहेत, ज्यामुळे दैनंदिन आरोग्य जपण्याचे काम पूर्वीपेक्षा सोपे होते. AGEasy ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याविषयी सखोल माहिती देते आणि आम्ही दोघांनी मिळून वाढत्या वयाच्या लोकांसाठी भारताची पहिली विशेष आतड्यांच्या आरोग्याची उत्पादनांची श्रेणी विकसित केली आहे.”
AGEasy फुफ्फुसांची काळजी, सांध्यांचे आरोग्य, पडण्यापासून प्रतिबंध, मधुमेह व्यवस्थापन आणि आता आतड्यांचे आरोग्य यांसारख्या जुन्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारी विचारपूर्वक निवडलेली उत्पादने सादर करून, वृद्धापकाळ सुलभ करण्याच्या आपल्या ध्येयावर कायम आहे. या नवीन उत्पादनांच्या प्रस्तुतीमुळे, AGEasy एक नाविन्यपूर्ण ब्रँड म्हणून आपले स्थान आणखी मजबूत करत आहे, जो ज्येष्ठ नागरिकांना सहजता, आनंद आणि स्वातंत्र्यासह जीवन जगण्यासाठी सक्षम करण्यास वचनबद्ध आहे.






