अनंत अंबानीने लग्नात परिधान केला १४ कोटींचा ब्रोच
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचा विवाह सोहळा राधिका मर्चंट हिच्या सोबत पार पडला. विवाह सोहळ्यासाठी देश विदेशातील आणि पाहुण्यांना बोलणवण्यात आले होते. तसेच राजकारणी नेते, सेलिब्रिटी यांच्या अनंत राधिका यांचे मित्र मंडळी विवाह सोहळ्याला उपस्थित होते. अनंत राधिकाच्या लग्नातील अंबानी कुटुंबियांचे सर्वच लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी तयार केलेले सर्वच कपडे अंबानी कुटुंबियांवर उठून दिसत होते.
अनंत अंबानी यांचा विवाह मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्याची सगळीकडे जोरदार तयारी करण्यात आली होती. विवाह सोहळ्यापूर्वीच्या विधींमध्ये अंबानी कुटुंबीयांनी अनंत अंबानी यांना लाल रंगाचा पारंपारिक साफा बांधला. त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. अबू जनी संदीप खोसला यांनी तयार केलेल्या केशरी रंगाच्या शेरवानीवर अनंत अंबानी यांना लाल रंगाचा सफा बांधण्यात आला. लाल रंगाच्या बांधणी सफ्यावर डायमंडचे ब्रोच लावण्यात आले. लाल रंगाचा सफा आणखीन उठावदार दिसण्यासाठी त्याच्यावर डायमंडचे ब्रोच लावण्यात आले. लावण्यात आलेला ब्रोच हा नाशपातीच्या आकाराचा असून त्याच्यावर बारीक हिरे लावण्यात आले होते. अनंत यांनी परिधान केलेल्या शेरवानी लुकमधून त्यांचे प्राण्यांवर असलेले पप्रेम स्पष्ट झाले आहे.(फोटो सौजन्य-instagram)
सफा बांधण्याचे महत्व:
हिंदू विवाहामध्ये लग्न लागताना सफा, टोपी किंवा पगडी बांधण्याला विशेष महत्व आहे. पारंपरिक विवाह सोहळ्यात सफा परिधान केला जातो. सफा परिधान केल्यामुळे लुक अधिक उठावदार आणि सुंदर दिसतो. सफा म्हणजे सन्मान, आदर आणि अभिमान. त्यामुळे हिंदू लग्न परंपरेमध्ये प्रामुख्याने सफा परिधान करण्याची पद्धत आहे. सफा हे वारसा आणि कौटुंबिक बंधनांचे शक्तिशाली प्रतीक आहे.