रात्री झोपण्याआधी कोरड्या त्वचेवर लावा 'हे' पदार्थ
राज्यभरात सगळीकडे थंडी वाढू लागली आहे. थंडी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. या दिवसांमध्ये वातावरणात गारवा असल्यामुळे आरोग्यासह त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचा कोरडी पडणे, त्वचेला भेगा पडणे, खाज येणे, त्वचेवर पांढरे डाग दिसणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम्स, लोशन, मॉइश्चरायझर, घरगुती उपाय इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. सतत चेहऱ्यावर कोणते ना कोणते प्रॉडक्ट लावल्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत त्वचेवर कोणत्याही गोष्टी लावू नये. असे केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरड्या त्वचेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती पदार्थ लावावे, याबद्दल सांगणार आहोत. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि मऊ दिसेल.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
ग्रीन टी त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. ग्रीन टी त्वचेला लावल्यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. टोनरचा वापर त्वचेवर केल्यामुळे त्वचेतील घाण स्वच्छ होते आणि ओपन पोर्स कमी होतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजरात मिळणारे महागडे टोनर वापरण्याऐवजी घरी बनवलेल्या टोनरचा वापर करावा. यासाठी गरम पाण्यात ग्रीन टी मिक्स करून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर थंड झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरून रात्री झोपण्याआधी नियमित त्वचेवर लावून ठेवा.
त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. खोबरेल तेलात असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. शिवाय या तेलामध्ये चांगले फॅट्स आढळून येतात. खोबरेल तेल त्वचेवर लावल्यामुळे त्वचा कोरडी आणि रुक्ष होत नाही. त्यामुळे रात्री झोपण्याआधी एक थेंब खोबरेल तेल घेऊन संपूर्ण त्वचेवर लावावे. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले बदाम तेल आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. बदाम तेलाचा वापर त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. शिवाय या तेलात विटामिन ई, फॅटी अॅसिड, प्रोटीन, झिंक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. बदाम तेल त्वचेमध्ये लगेच मुरते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी त्वचेवर बदाम तेल लावावे.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
त्वचेसंबंधित सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जातो. कोरफड जेल त्वचेमध्ये लगेच मुरते. शिवाय यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. कोरफड जेल तुम्ही मॉइश्चरायजर म्हणून वापरू शकता. यामुळे हिवाळ्यासह सर्वच ऋतूंमधले त्वचा ताणली जात नाही.