चुकूनही लावू नका स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ
त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना ना काही उपाय करत असतात. कधी सोशल मीडियावर पाहून कोणतेही घरगुती उपाय करणे तर कधी बाजारात मिळणाऱ्या महागड्या केमिकल ट्रीटमेंट करून घेणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण याचा फारकाळ प्रभाव टिकून राहत नाही. सतत कोणते ना कोणते घरगुती किंवा केमिकल उपाय केल्यास त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा टॅन झाल्यानंतर चेहऱ्यावर सोशल मीडियावर दाखवणारे वेगवेगळे उपाय केले जातात. हे उपाय केल्यामुळे त्वचा कोरडी आणि रुक्ष होऊन जाते. पण सुंदर त्वचा करण्यासाठी वापरले जाणारे घरगुती पदार्थसुद्धा त्वचेचे नुकसान करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर थेट त्वचेवर करू नये, याबद्दल सांगणार आहोत. वापर केल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओमध्ये सुंदर दिसण्यासाठी आणि त्वचेवरील काळेपणा घालवण्यासाठी सफेद रंगाच्या टूथपेस्टचा वापर केला जातो. पण असे केल्यामुळे त्वचेचे नुकसान होते. टूथपेस्टमध्ये असलेले केमिकल गुणधर्म त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या किंवा इतर कोणत्याही रंगाच्या टूथपेस्टचा वापर त्वचेसाठी करू नये.
बेकिंग सोड्याचा वापर त्वचेवरील डाग आणि काळेपणा घालवण्यासाठी केला जातो, पण हे चुकीचे आहे. बेकिंग सोडा त्वचेसाठी वापरल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल निघून जाते. शिवाय त्वचा कोरडी होऊन जाते. त्यामुळे सुंदर त्वचेवर बेकिंग सोडा लावणे टाळलं पाहिजे. बेकिंग सोडा त्वचेवर चुकूनही लावू नये.
नैसर्गिक स्क्रब म्हणून साखरेचा वापर केला जातो. साखरमध्ये असलेले गुणधर्म त्वचा खराब करून टाकतात. शिवाय संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी चेहऱ्यावर साखर लावू नये. त्यामुळे त्वचेवर कमीत कमी प्रमाणात साखरेचा वापर करावा.
त्वचेवरील टॅन घालवण्यासाठी आणि सुंदर त्वचेसाठी अनेक महिला त्वचेवर चेहऱ्यावर टोमॅटोचा रस लावला जातो. टोमॅटोमध्ये असलेले गुणधर्म ब्लीचिंग एजंट म्हणून त्वचेवर काम करतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ होते. पण टोमॅटोचा रस त्वचेवर थेट लावल्यास त्वचेची गुणवत्ता खराब होऊ शकते. यामध्ये असलेले ॲसिड त्वचेचा पीएच खराब करून टाकतात.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
विटामिन सी युक्त लिंबाचा वापर त्वचेसाठी केला जातो. यामुळे त्वचेवरील डाग, टॅनिंग निघून जाते. पण लिंबाच्या रसाचा वापर त्वचेवर थेट करू नये. या रसाचा वापर त्वचेवर थेट केल्यामुळे इन्फेक्शन किंवा सनबर्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेवर कोणतेही घरगुती उपाय करताना ते त्वचेला सूट होतील की नाही हे पाहावे.