लोकल प्रवासी घटले, तरीही उपनगरीय लोकलला गर्दी
मध्य रेल्वेचा पसारा सीएसएमटी ते खोपोली, आसनगाव, पनवेलपर्यंत, नेरुळ ते खारकोपर, ठाणे ते पनवेलदरम्यान पसरलेला आहे. दररोज १ हजार ८१० लोकलच्या माध्यमातून सुमारे ३८ लाख प्रवासी मध्य रेल्वेने प्रवास करतात. कोरोनापूर्वी मध्य रेल्वेची प्रवासी संख्या ४२ लाखांच्या घरात होतो. कोरोनानंतर हळुहळु रेल्वेची प्रवासी संख्या पूर्ववत होऊ लागली. परंतु आजही प्रवासी संख्या ४२ लाखांपर्यंत पोहोचलेली नाही. तरी देखील उपनगरीय लोकलला रोजच प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. अनेक कार्यालये बीकेसी, अंधेरी यासारख्या भागात सुरू किंवा स्थलांतरीत झाली आहेत.
सकाळी-संध्याकाळी लोकलमध्ये चढणे-उतरणे जिकिरीचे झाले आहे. जून महिन्यात मुंब्रा स्थानकात अप-डाउन जलद मार्गावरुन धावणाऱ्या दोन लोकलच्या दरवाज्यात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा अडकल्याने अपघात घडला होता. या अपघातानंतर लोकलच्या गदर्दीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. परंतु रेल्वेच्या तिक्रिटविक्रीचा आकड़ा मात्र वेगळेच सांगतो.
पश्चिम रेल्वे कांदिवली आणि बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे काम वेगाने सुरू करत आहे. पूर्ण झाल्यानंतर, बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान लोकल ट्रेन सेवांची संख्या २२ ने वाढेल, ज्यामुळे प्रवाशांच्या सोयीत लक्षणीय सुधारणा होईल. ही सेवा जानेवारीमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. लवकरच नवीन वेळापत्रकात हे दिसून येईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या प्रकल्पाच्या पूर्णतेची बऱ्याच काळापासून वाट पाहिली जात होती. पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी काम अत्यंत अचूकतेने केले जात आहे. याव्यतिरिक्त, उपनगरीय रेल्वे नेटवर्कची प्रवासी क्षमता वाढवण्याचे दीर्घकाळ प्रलंबित काम देखील मजबूत केले जात आहे.






