मुगाच्या डाळीचा फेसपॅक तयार करण्याची कृती
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. त्वचेवरील ग्लो निघून जाऊन त्वचा काळी दिसू लागते. त्यामुळे या दिवसांमध्ये आहारात बदल करून त्वचेची योग्य काळजी घ्यावी. त्वचेवरील चमक निघून गेल्यानंतर त्वचा सुंदर आणि ग्लोइंग करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण त्वचेला वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण द्यावे, यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर होते. सुंदर त्वचेसाठी आहारात थंड पदार्थ, विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे त्वचा सुंदर आणि हायड्रेट राहील.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअर संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी मुगाच्या डाळीचा वापर करू शकता. हिवाळ्यात काळवंडलेली त्वचा चमकदार आणि गोरीपान करण्यासाठी मुगाच्या डाळीचा फेसपॅक तयार करून चेहऱ्याला लावल्यास त्वचा चमकदार आणि सुंदर दिसेल. हिरव्या मुगाची डाळ स्वयंपाक घरात नेहमीच उपलब्ध असते. अनेकदा घरी कोणी आजारी पडल्यानंतर किंवा हलके जेवण जेवण्याची इच्छा झाल्यानंतर मुगाच्या डाळीची खिचडी बनवून दिली जाते. त्यामुळे मुगाची डाळ शरीरासाठी आवश्यक आहे. मुगाची डाळ आरोग्यासोबतच त्वचेसाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. आज आम्ही तुम्हाला हिरव्या मुगाच्या डाळीचा वापर करून फेसपॅक तयार करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने फेसपॅक तयार करून त्वचेला लावल्यास चेहरा चमकदार आणि सुंदर दिसेल.
हिरव्या मुगाच्या डाळीचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कच्च दूध घेऊन त्यात मुगाची डाळ भिजत ठेवा. रात्रभर डाळ व्यवस्थित भिजल्यानंतर सकाळी मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेल्या पेस्टमध्ये बदाम पावडर आणि कोरफड जेल मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. त्यानंतर १५ मिनिटं ठेवून नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवर डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा सुंदर आणि चमकदार दिसेल.
स्किन केअर संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मुगाच्या डाळीचा फेसवॉश बनवण्यासाठी, हिरव्या मुगाची डाळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. या वाटलेल्या डाळीने तुम्ही चेहरा धुवू शकता. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा चमकदार आणि सुंदर होण्यास मदत होईल. शिवाय तुम्ही यामध्ये चंदन पावडर, कुडिंलबाची पावडर, हळद, मुलतानी माती इत्यादी पदार्थ मिक्स करू शकता. या पावडरचा वापर केल्यामुळे त्वचेवरील सर्व घाण स्वच्छ होईल आणि चेहरा चमकदार सुंदर दिसेल. मुगाच्या डाळीमध्ये असलेले गुणधर्म त्वचा चमकदार करण्यासाठी मदत करतात.