बेडशीटची नियमित स्वच्छता आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यावर घाम, मृत त्वचा, धूळ आणि बॅक्टेरिया जमा होतात, जे डोळ्यांना दिसत नाहीत. तज्ञांच्या मते आठवड्यातून किमान एकदा बेडशीट बदलणे गरजेचे आहे.
Clean Bedding Tips: आपण आपल्या आरोग्याबाबत बरेच सतर्क असतो. त्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करतो ती म्हणजे स्वच्छता. स्वतःची त्याबरोबर आपल्याशी निगडीत असलेली प्रत्येक गोष्टी वेळीवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे. आपण नेहमी रात्री आरामदायक झोपेसाठी अंथरुणावर जातो. पण कधी विचार केलाय का की आपण झोपत असलेलं अंथरुणावर काय काय जमा झालेलं असेल…? आपल्याला घाम येतो, आपल्या नकळत आपली मृत त्वचा गळते, केस गळतात आणि त्याव्यतिरिक्त खोलीत असलेली भयंकर धूळ येऊन त्यावर बसते. जर तुमच्या घरात पाळीव प्राणी किंवा लहान मुलं असतील तर हे काम आणखी वाढतं.
आजूबाजूला असलेल्या गोष्टी बेट्सशीट्स खराब करतात. जरी आपल्याला डोळ्यांनी त्या कितीही स्वच्छ दिसत असतात त्यामुळे त्यांना बदलण्याचा विचार आपण टाळतो पण तरीही त्याच्यावर बऱ्याच गोष्टींचे अंश चिटकलेले असतात. यासगळ्यावर एक्सपर्ट्स सांगतात की फक्त साफ दिसणं पूरेसं नसतं. वास्तवात असलेली अस्वच्छता आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे बेड्सशीट बदलण्याचा एक निश्चित असात दिनक्रम असणं गरजेचं आहे. नियमितपणे बेड्सशीट धुतल्याने बॅक्टेरिया कमी होतात. दुर्गंधी दूर होते आणि अॅलर्जीचा धोका कमी होतो. स्वच्छ बेड्सशीटमुळे आपल्याल चांगली झोप मिळते. त्वचेच्या समस्या कमी होतात. पण ही बेड्शीट किती वेळा बदलली पाहिजे? या प्रश्नाबाबत तज्ञ काय सांगतात?
बेड्शीट किती वेळा बदलली पाहिजे?
आठवड्यातून एकदा बेड्शीट बदलणे आणि धुणे सर्वौत्तम मानलं जातं. यामुळे घाम, मृत त्वचा, धूळ आणि बॅक्टेरिया सारख्या समस्यांपासून दूर राहता येतं. यामुळे वेड स्वच्छ राहतो आणि त्याचा उत्तम फायदा आरोग्यावर होतो.
पण बहुतेक लोकं आपली बेड्शीट धूतच नाहीत. बरेच लोक दर 24 दिवसांनी किंवा 3 ते 4 आठवड्यांनी त्यांच्या बेड्शीट्स बदलतात. काही जण तर महिनोन महिने ती बदलण्याचे कष्टच घेत नाही. तज्ञांच्या मते ही सवय चांगली नाही.
बेड्शीट्स कधी बदलल्या पाहिजेत?
बऱ्याच परिस्थितींमध्ये फक्त आठवड्यातून एक वेळा बेड्शीट बदलणं पुरेसं नसतं. जर तुम्हाला खूप घाम येत असेल. तुमच्या घरात मुलं किंवा पाळीव प्राणी असतील. जे तुमच्या बेडवर झोपत असतील तर बेड्शीट बदलणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर स्वतःच्या काळजीसाठीही वेळोवेळी बेड्शीट बदलणं गरजेचं आहे. जर तुमची त्वचा संवेदनशील आहे किंवा तुम्ही आजारी असाल तर बेड्शीटवर बॅक्टेरियाचा धोका वाढतो. जंतू, अॅलर्जीचा धोका कमी करण्यासाठी यासर्व गोष्टींची काळजी घेत स्वच्छता राखणे फार गरजेचे आहे. आठवड्यातून 2-3 वेळा निदान बेड्शीट बदलणं चांगली सवय मानली जाते.
बेड्शीट स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या टिप्स-
फक्त बेड्शीट पाण्याने स्वच्छ करणं पुरेसं नाही, तर योग्य स्वच्छता आवश्यक आहे.
बेडशीट धुतल्यानंतर ती पूर्णपणे वाळवणं आवश्यक आहे. कारण बेड्शीट ओली राहिली तर बॅक्टेरिया लवकर वाढतात.
रात्री बेडवर जाण्यापूर्वी किंवा झोपण्यापूर्वी आंघोळ करणं किंवा स्वच्छ कपडे घालून अंथरूणावर जाणं ही सवय फार मदत करते.
बेडवर खाद्यपदार्थ खाणं टाळा, काहींना जेवण बेडवर आणून जेवायची सवय असते त्यामुळे अस्वच्छता वाढते.
पाळीव प्राण्यांना जरी तुम्ही स्वच्छ करत असाल तरीही त्यांमुळे अनावश्यक गोष्टींचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे त्यांना वेगळे झोपवा.
बेडशीटसोबतच्या इतर गोष्टी कधी धुवाव्यात?
फक्त चादर नाही तर इतर वस्तू स्वच्छ करणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. उशावर केस असतात त्यामुळे उशीचं कव्हर आठवड्यातून एकदा बदलणं आवश्यक आहे. ड्युवेट्स किंवा कम्फर्टर दर काही महिन्यांनी धुवावेत. नियमित स्वच्छतेसह, चांगल्या दर्जाची चादर 2-3 वर्षे तुम्हाला चांगला आराम देऊ शकते.