दुधाच्या मलाईमुळे त्वचेला होणारे फायदे
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. त्वचा कोरडी पडणे, त्वचेच्या साली निघणे, त्वचा रुक्ष आणि निस्तेज दिसणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर मेकअप करतात. मात्र मेकअप करून सुद्धा त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. त्वचा कोरडी झाल्यानंतर त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. अशावेळी त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेसंबंधित समस्या जाणवू लागल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम्स, केमिकल ट्रीटमेंट इत्यादी गोष्टी करण्यास अधिक प्राधान्य देतात. मात्र काहीवेळा तरीसुद्धा त्वचेवर चमक येत नाही. सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी त्वचेला आतून पोषण देणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी दुधाच्या सायीमध्ये कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दुधाच्या मलईचा वापर करावा. यामुळे त्वचा मुलायम आणि सुंदर दिसते. यामध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म आढळून येतात, ज्याचा त्वचेलासुद्धा फायदा होतो. त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दुधाच्या सायीचं वापर करावा. यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते. त्वचेवरील कोरडेपणा घालवण्यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये दिवसभरातून एकदा तरी त्वचेवर दुधाची मलाई लावावी यामुळे कोरडी त्वचा मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते. शिवाय त्वचेची गुणवत्ता सुधारते.
मधाचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचा उजळदार आणि चमकदार होण्यास मदत होते. यामुळे त्वचेवरील पिंपल्सचे डाग निघून जाण्यास मदत होईल. एक चमचा मधामध्ये थोडस दूध मिक्स करून त्वचेवर लावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल. शिवाय चेहऱ्यावर आलेले पिंपल्सचे डाग निघून जातील. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा एकदा गोरीपान होते.
दुधामधील मलाई त्वचेमधील मऊपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेची गुणवत्ता सुधारते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा फाटू लागते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी दुधाच्या मलईचा वापर करावा. वाढत्या वयात त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी दुधाच्या मलईचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा फ्रेश दिसते.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी दुधाच्या मलईचा वापर करू शकता. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होईल आणि सुंदर दिसू लागेल. त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी मलाईमध्ये हळद आणि बेसन मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण त्वचेवर लावून ५ मिनिटं ठेवून नंतर हलक्या हाताने मसाज करून घ्या. नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. यामुळे त्वचेवरील समस्या कमी होतील.