प्रिय व्यक्तींना मिठी मारण्याचे 'हे' आहेत फायदे
जगभरात सगळीकडे फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. या वीकमध्ये अनेक वेगवेगळे डे साजरा केले जातात. त्यात 12 फेब्रुवारीला ह्ग डे साजरा केला जातो. जोडीदारावर असलेले प्रेम आणखीन घट्ट होण्यासाठी ह्ग डे साजरा केला जातो. तसेच या दिवशी प्रिय व्यक्तीला मिठी मारून हा दिवस आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. प्रेमामध्ये मिठी मारणे म्हणजे आवडत्या व्यक्तीवर असलेले प्रेम व्यक्त करणे. त्यामुळे तुम्ही केवळ प्रियकर-प्रेयसी म्हणूनच नाही तर आई, वडील, मित्र, मैत्रीण या नात्यांमध्ये सुद्धा ह्ग डे साजरा करू शकता. यामुळे दोन व्यक्तींमधील शारीरिक जवळीक वाढून स्नेहभावना, आपुलकी, प्रेम व्यक्त केले जाते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला प्रिय व्यक्तीला मिठी मारल्याने नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
Promise Day 2025 : वचनांचे महत्त्व सांगणारी प्रेरणादायी गोष्ट
पूर्वीच्या काळापासून शारीरिक जवळीक व्यक्त करून प्रेम व्यक्त केले जात होते. मात्र अजूनही कायमचं ही परंपरा चालू आहे. मिठी मारल्यामुळे प्रेम, स्नेहभावना, आपुलकी, काळजी, आपलेपणा दिसून येतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. मिठी मारल्यामुळे दोन व्यक्तींमध्ये असलेले प्रेमाचे नाते आणखीन घट्ट होते. तसेच मनात निर्माण झालेली एकटेपणाची भावना कमी होते. आवडत्या व्यक्तीला मिठी मारल्यामुळे तणाव, नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होते.
आवडत्या व्यक्तीला मिठी मारल्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय आरोग्य सुधारते. मिठी मारल्यामुळे शरीरात ऑक्सिटॉक्सिन नावाचे हार्मोन तयार होते आणि रक्तामध्ये मिक्स होते. यामुळे मानसिक तणाव कमी होतो. तसेच शरीरात हॅप्पी हार्मोन्स सक्रिय होतात. रक्तदाब नियंत्रणात राहणे, हृद्यासंबंधित आजार कमी होणे इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारल्यामुळे शरीरातील रक्तभिसरण सुधारते आणि मूड फ्रेश राहतो. काहीही न बोलता प्रेम व्यक्त करताना एक मिठी खूप मोठा अर्थ सांगून जाते. याशिवाय एखादया व्यक्तीला बराच वेळ मिठी मारल्यामुळे मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन आनंदाच्या रूपात बाहेर पडतात, ज्यामुळे खराब झालेला मूड सुधारण्यास मदत होते.
Promise Day 2025 का साजरा करतात? ‘प्रॉमिस डे’निमित्त स्वतःला कोणते वचन द्याल
मिठी मारल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारून शरीरामध्ये सकरात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तणाव, थकवा कमी होऊन जातो. याशिवाय शरीराची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. मिठी मारल्यामुळे चांगल्या आठवणी तयार होतात. तसेच आनंदी आणि रिलॅक्स वाटू लागते. मिठी मारल्यामुळे मेंदू पूर्वीपेक्षा अधिक वेगाने काम करतो.