Rajyasabha Electiion 2026: 26 बिनविरोध...; आता राज्यसभेच्या 'या' ११ जागांसाठी होणार निवडणूक
येत्या १६ मार्चला होणाऱ्या निवडणुकीसाठी बिहारमधील ५, ओडिसामधील ४ आणि हरियाणायातील २ जागांसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचीही राज्यसभेवर निवड होण्याची शक्यता आहे. बिगारमधील ५ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपचे शिवेश कुमार यांच्या विरोधात एडी सिंह यांच्यात लढत होणार आहे.
LPG Gas Shortage : गॅसच्या तुटवड्यावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; संपूर्ण देशात ESMA कायदा लागू
महाराष्ट्राशिवाय तामिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५), तेलंगणा (२), छत्तीसगड (२) आणि आसाम (३) मधील उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अभिषेक मनु सिंघवी (तेलंगणा) आणि एम. थंबीदुराई (तामिळनाडू) यांचा समावेश आहे.
या ११ जागांसाठी होणार मतदान:
उर्वरित ११ जागांवर एकापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्याने १६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये बिहार (५ जागा), ओडिशा (४ जागा) आणि हरियाणा (२ जागा) यांचा समावेश आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे नितीन नबीन रिंगणात असल्याने तेथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील सात जागांसाठी सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते आणि रामदास वडकुते हे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि शिवसेनेकडून ज्योती वाघमारे हे देखील निवडणूक लढवत आहेत. विरोधी राष्ट्रवादी (सपा) कडून शरद पवार देखील निवडणूक लढवत आहेत. राज्यसभेचे सर्व सात उमेदवार बिनविरोध निवडून येतील. तामिळनाडूमधील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
टी. शिवा आणि सी. रवींद्रन हे द्रमुक कडून निवडणूक लढवत आहेत, तर एम. क्रिस्टोफर टिळक हे काँग्रेस कडून, अंबुमणी रामदास हे पीएमके कडून आणि एल.के. सुधीश हे डीएमडीके कडून निवडणूक लढवत आहेत. एम. थंबीदुराई हे एआयएडीएमके कडून निवडणूक लढवत आहेत. सर्व सहा राज्यसभेचे उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत.






