दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
सतत चॉकलेट किंवा इतर पदार्थ खाऊन आल्यावर दात स्वच्छ केले नाहीतर दातांवर पिवळा थर जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे हळूहळू दातांचा पांढरेपणा निघून जाऊन दात पूर्णपणे पिवळे होऊन जातात. दातांवर साचलेला पिवळा थर ही सामान्य समस्या असून यामुळे अनेकांचे दात खराब झाले आहेत. तंबाखू, चहा, कॉफी, किंवा जेवल्यानंतर दात स्वच्छ केले नाहीतर दात पिवळे होऊन जातात. दातांसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र असे केल्यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. दातांवर साचलेला पिवळा थर दातांचे सौंदर्य पूर्णपणे खराब करून टाकतो.
दातांवर साचलेलं पिवळेपणा घालवण्यासाठी अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रीम्स लावल्या जातात. पण हे उपाय करून सुद्धा दातांवरील पिवळेपणा घालवता येत नाही. बाजारात अनेक आयुर्वेदिक चूर्ण आणि मशेरी उपलब्ध आहे. पण सतत मशेरी किंवा चूर्ण लावल्यामुळे दातांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दात स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही दात स्वच्छ करून शकते. तसेच तुमच्या दातांवरील पिवळेपणा कमी होऊन दातांचे सौदंर्य वाढेल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: केसांना तूप लावण्याचे जबरदस्त फायदे
दातांवरील पिवळेपणा कमी करण्यासाठी केळ्याची साल प्रभावी ठरेल. कारण केळ्यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे दातांवरील पिवळेपणा कमी होतो. केळ्याची साल ब्लिचिंग एजंट म्हणून दातांवर काम करते. त्यामुळे घरी आणलेल्या केळ्याची साल फेकून न देतात, तिचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी करा.
आयुर्वेदामध्ये तुळशीच्या झाडाला विशेष महत्व आहे. धार्मिक आणि रोजच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. त्यामुळे तुळशीचा वापर करून तुम्ही दातांवरील पिवळेपणा घालवू शकता. तुळशीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म दातांवरील बॅक्टेरिया नष्ट करून दात स्वच्छ करतात. जर तुम्ही तुळशीच्या पानांचा नियमित वापर केला तर तुमचे दात स्वच्छ होतील.
हे देखील वाचा: मोबाईलच्या व्यसनामुळे होतात हाडांचे आजार, जरा सांभाळून
दात स्वच्छ करण्यासाठी लिंबूचा वापर करा. दातांवरील पिवळेपणा काढून दात स्वच्छ करण्याचे काम लिंबू करतो. यासाठी तुम्ही एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून गुळण्या किंवा लिंबाची साल दातांवर घासू शकता. हा उपाय आठवड्यतून दोनदा किंवा तीनदा केल्यामुळे दातांवरील पिवळेपणा कमी होऊन दात चमकदार आणि स्वच्छ दिसतील.