खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत खोकला आणि सर्दी झाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. तसेच सतत खोकल्यामुळे घसा दुखू लागतो. वातावरणात बदल झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. कधी ऊन कधी वारा तर कधी पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे रोगराई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. डेंग्यू, मलेरिया, टायफाईड इत्यादी आजारांचे प्रमाण वाढल्यामुळे बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले ताजे अन्नपदार्थ खावेत, जे आरोग्यासाठी आणि पचनास हलके असतील.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत ताप येणे, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे इत्यादींचा अनेक समस्या जाणवू लागतात. सतत खोकला आल्यामुळे घसा दुखायला सुरुवात होते. पण पावसाळ्यातील आजारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुढे जाऊन हेच आजार मोठे होतात. सतत खोकला लागून तुमचा आवाज बसला असेल तर घरगुती उपाय नक्की करून पहा. घरगुती उपाय केल्यामुळे तुमचा बसलेला घसा पुन्हा एकदा मोकळा होऊन आवाज सुटेल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: शरीर स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ डिटॉक्स ड्रिंकचा समावेश, यकृत होईल स्वच्छ
खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
घसा दुखणे आणि खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी एक चमचा मधासोबत आल्याचा बारीक तुकडा खा. यामुळे तुमचा घसा दुखायचा थांबून आवाज व्यवस्थित येईल. सगळ्यांच्या घरात मध उपलब्ध असते. मधामध्ये असलेल्या नैसर्गिक गोडव्यामुळे आणि गुणधर्मामुळे घशाचे दुखणे कमी होईल. तसेच घसा दुखण्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही आल्याच्या रसात मध मिक्स करूनसुद्धा पिऊ शकता.
खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
आयुर्वेदिक गुणधर्म असलेली तुळशीची पाने अनेक गंभीर आजारांवर प्रभावी आहेत. तुळशीच्या काड्यांपासून ते बियांपासून सर्वच गोष्टींचा वापर केला जातो. घसा दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ते उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळवूनझाल्यानंतर त्यात तुळशीची पाने टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित उकळवून घ्या. हा उपाय केल्यामुळे तुमचा घसा दुखणे कमी होईल.
हे देखील वाचा: हार्ट अटॅक आल्यावर मोठ मोठ्याने खोकून आपला प्राण वाचू शकतो? जाणून घ्या सत्य
खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
स्वयंपाक घरातील सर्वच पदार्थांमध्ये वापरली जाणारी हळद औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. हळदीमध्ये असलेले विटामिन अनेक आजारांवर प्रभावी आहे. हळदीमध्ये अँटीसेप्टिक असते. जखम झाल्यानंतर किंवा वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. एक ग्लास दुधात हळद टाकून प्यायल्यामुळे घसा दुखणे बंद होईल.