धार्मिक विधींमध्ये कापूरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यासोबतच कापूर शरीरासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर ठरते. थंडीत धूळ, प्रदूषण, प्रदूषण आणि सततचा ताण कमी करण्यासाठी कापूरचा वापर केला जातो. बऱ्याचदा जास्त धूळ, मातीमध्ये गेल्यानंतर श्वासाच्या समस्या उद्भवू लागतात. वारंवार शिंका येणे, नाक झोंबणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागल्यास कापूरचा वापर करावा. वातावरणातील घाणेरडे वास, धूर, अचानक चक्कर येणे किंवा मनावर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी कापूरचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला कापूरच्या वापरामुळे त्वचेला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कापूर ठरेल वरदान! जाणून घ्या शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे

घरात, देवघरात किंवा मुलांच्या खोलीत कायमच कापूर जळलेले जाते. यामुळे सगळीकडे कापूरचा सुगंध पसरतो आणि आजूबाजूचे वातावरण शुद्ध राहते.

धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते. हा तणाव कमी करण्यासाठी कापूरचा वापर करावा. कापूराचा तीव्र पण स्वच्छ सुगंध तणावापासून सुटका मिळवून देतो.

सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी कापूर अतिशय प्रभावी ठरते. संध्याकाळच्या वेळी घरात नियमित एक किंवा दोन कापूर गोळ्या जाळल्यास घरात शांत वातावरण राहील.

केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा आणि केसांच्या इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कापूर अतिशय प्रभावी ठरते. वाटीमध्ये खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात कापूर वड्या रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर तयार केलेले तेल केसांवर लावून मसाज करावे.

हाडांमध्ये वाढलेल्या आणि हातापायांचे स्नायू दुखणे इत्यादी सर्वच समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कापूर अतिशय प्रभावी ठरते. कापूरच्या तेलाने हाडांना मालिश करावी.






