कॅन्सर- हार्ट अटॅकचा धोका होईल कायमचा नष्ट! नियमित करा 'या' १० रुपयांच्या फळांचे सेवन
जगभरात हार्ट अटॅक, कॅन्सर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हार्ट ब्लॉकेज इत्यादी गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. रुग्ण संख्येत होणाऱ्या वाढीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जीवनशैलीत होणारे बदल, आहारात होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव, अतिप्रमाणात प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यासमुळे शरीराला आजारांची लागण होते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. कारण या दिवसांमध्ये रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीर मजबूत ठेवण्यासाठी पेरूचे सेवन करावे. आंबट गोड चवीचा पेरू लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पेरू खाताना त्यावर मीठ टाकून खाल्ल्यास चव अतिशय सुंदर लागते. किमतीने अतिशय स्वस्त असलेले फळ आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नियमित पेरू खाल्ल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
विटामिन सी युक्त पेरूचे सेवन केल्यामुळे शरीराला आणि त्वचेला अनेक फायदे होतात. पेरू खाल्ल्यामुळे शरीरात कोलेजन निर्मितीला प्रोत्सहन मिळते. यामुळे त्वचा कायमच फ्रेश आणि ताजीतवानी राहते. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या, पिंपल्स, काळे डाग कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणानंतर नियमित एक पेरू खावा. पेरू केवळ त्वचेसाठी नाहीतर केसांसाठी सुद्धा गुणकारी ठरतो. पेरूचे सेवन केल्यामुळे केसांची मूळ मजबूत राहतात आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते. वय वाढल्यानंतर चेहऱ्यावरील तारुण्य कमी होऊन जाते. हेच तारुण्य कायम टिकवून ठेवण्यासाठी नियमित एक पेरू खावा.
पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हृदयाचे स्नायूंना पोषण देण्यासाठी पेरूचे सेवन करावे. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले घाणेरडे फॅट नष्ट होते. नियमित एक पेरू खाल्ल्यास हृदयाच्या गंभीर आजारांचा धोका टाळता येईल आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रणात राहील. कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यासाठी आणि रक्तभिसरण सुधारण्यासाठी पेरूचे सेवन करावे.
पेरूचे सेवन केल्यामुळे कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढत नाही. या पेशी नष्ट होऊन जातात. पेरूमध्ये असलेले लायकोपीन आणि इतर अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यासाठी मदत करतात. फ्री रॅडिकल्स डीएनएला नुकसान पोहोचवतात यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवामध्ये ट्युमर होण्याची शक्यता असते. त्यामुळे नैसर्गिकरित्या शरीराचे रक्षण करण्यासाठी पेरूचे सेवन करावे.
पेरूची सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आतड्यांचे कार्य सुलभ बनते. पचनाचा त्रास किंवा आम्लपित्ताची समस्या कमी करण्यासाठी पेरूचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पेरूचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.
Ans: मूत्रपिंडाचे आजार असलेल्या लोकांनी जास्त पोटॅशियमयुक्त पदार्थ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Ans: कर्करोग म्हणजे शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होणे, ज्यामुळे ट्यूमर (गाठ) तयार होतो.
Ans: बद्धकोष्ठता म्हणजे आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा आतड्याची हालचाल होणे.






