पुण्यात दुर्मिळ आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ! जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
जगभरात कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा नव्या विषाणूने डोके वर काढले आहे. पाच वर्षांआधी जगभरात सगळीकडे पसरलेल्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यस्था कोलमडून गेली होती. कोरोना विषाणूची लागण झालेल्या अनेक रुग्णांनाच मृत्यू देखील झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पुण्यात नव्या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. या नव्याने पसरलेल्या विषाणूचे नाव गुइलेन-बॅरे सिंड्रोम असे आहे. या आजाराचे पुण्यात 22 रुग्ण आढळून आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांचे नमुने आयसीएमआर-एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. याशिवाय या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यातील सिंहगड परिसरात सापडले आहेत.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा दुर्मिळ आजार असून यामध्ये अचानक शरीरात सुन्नपणा जाणवणे, स्नायू कमकुवत होणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसून आली आहेत. तसेच हा आजार झालेल्या रुग्णांना कमकुवतपणा जाणवू लागला आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 22 वर पोहचली असून बहुतेक रुग्ण 12 ते 30 वयोगटातील आहेत. याशिवाय 59 वर्षीय रुग्णाला सुद्धा नव्या सिंड्रोमची लागण झाली आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक गंभीर आजार आहे. याशिवाय हा आजार मज्जासंस्थेशी संबंधित असून रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. ज्यामुळे हात पाय सुन्न होणे, हातापायांची हालचाल थांबणे, स्नायू कमकुवत होणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसून आली आहेत. हा आजार झालेल्या रुग्णांची स्थिती अतिशय गंभीर असून त्यांना चालणे किंवा श्वास घेण्यास अनेक अडचणी येत आहेत.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा गंभीर सिंड्रोम व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गानंतर उद्भवण्याची शक्यता असते. ज्यावेळी शरीर संसर्गाशी लढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा चुकून शरीराच्या नसांवर परिणाम होऊन हा आजार होण्याची शक्यता असते. ज्यामुळे शरीरात सतत अशक्तपणा आणि कमकुवतपणा जाणवू लागतो. त्यामुळे या आजाराची शरीरात लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.गुइलेन-बॅरे सिंड्रोम वेळेवर उपचार घेतल्यानंतर पूर्णपणे बरा होऊ शकतो. सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णाची योग्य काळजी घेतल्यास रुग्ण हळूहळू त्याचे सामान्य जीवन जगू शकतो.