हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे
निरोगी आरोग्य जगण्यासाठी हृदय निरोगी असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयाचे कार्य चांगले ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र हल्लीच्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, अपुरी झोप, तेलकट तिखट पदार्थांचे सेवन, मानसिक तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे अनेकदा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हल्ली चुकीच्या जीवनशैलीमुळे हृद्यासंबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे. आहारात फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील.(फोटो सौजन्य – iStock)
जास्त पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी ठरेल घातक? जाणून घ्या शरीरासाठी नियमित किती पाणी पिणे आवश्यक
तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतात. याशिवाय कोलेस्टरॉलमुळे वाढलेला पिवळा चिकट थर हृदयाचे कार्य पूर्णपणे बिघडवून टाकतो. ज्यामुळे हृदयविकार किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात ब्रोकोली आणि गाजरचे सेवन करावे. ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम, फायबर इत्यादी घटक आढळून येतात. त्यामुळे तुम्ही ब्रोकोलीपासून सूप, भाजी किंवा इतर पदार्थ बनवू शकता. याशिवाय गाजर थंडीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. गाजर खाल्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे नियमित गाजरचे सेवन करावे.
पोषक तत्वांनी समृद्ध असलेले बदाम दैनंदिन आहारात नियमित भिजवलेले बदाम खावेत. भिजवलेले बदाम खाल्यामुळे शरीराला कॅल्शियम मिळते. यासाठी पाण्यात २ किंवा ३ बदाम भिजत घालून सकाळी उठल्यानंतर बदामाचे सेवन करावे. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिज आढळून येतात, जी हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहेत. शरीरात वाढलेला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम खावेत.
रोजच्या जेवणात लसूणचा वापर केला जातो. लसूणचा वापर फोडणी देण्यासाठी केला जातो. यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढण्यास मदत होते. लसूणमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल, विटामिन सी, बी, कॅल्शियम, सेलेनियम, मँगनीज इत्यादी घटक आढळून येतात. ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत नाही. याशिवाय हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होत नाहीत.
लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. बाजारात हंगामी फळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे दैनंदिन आहारात तुम्ही लिंबूवर्गीय फळांचे नियमित सेवन करू शकता. या फळांमध्ये भरपूर जीवनसत्वे, खनिजे आणि इतर घटक आढळून येतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी आहारात लिंबू वर्गीय फळांचे सेवन करावे.