जास्त पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी ठरेल घातक?
निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याचे सेवन केले जाते. नियमित 7 ते 7 ग्लास पाणी प्यावे. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील. शरीर आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेली विषारी घाण स्वच्छ होण्यासाठी नियमित पाण्याचे भरपूर सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील अनेक कामे सुरळीत होतात. त्यामुळे कोणताही पदार्थ खाल्यानंतर किंवा जेवल्यानंतर पाण्याचे भरपूर सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीर स्वच्छ होते. शरीरातील सर्व घाण स्वच्छ होते. साथीच्या आणि अनेक गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी पाण्याचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
युरिक ॲसिड, सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी १० रुपयांची ‘ही’ खास चटणी ठरेल प्रभावी
जीवन जगण्यासाठी पाणी आवश्यक लागते. मात्र, अतिप्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय घाट ठरू शकते. जास्त पाण्याचे सेवन केल्यामुळे ओवरहायड्रेशनची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन करावे. याशिवाय या स्थितीला वॉटर इंटाक्सिकेशन असे म्हंटले जाते. जास्त पाण्याचे सेवन केल्यामुळे किडनीवर दाब पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जास्त पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याचे नेमके काय नुकसान होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
पाणी पिताना ते योग्य पद्धतीमध्ये पिणे आवश्यक आहे. पाणी पिताना कधीही उभं राहून पाण्याचे सेवन करू नये. याशिवाय पाणी कधीच घाईमध्ये पिऊ नये. असे केल्यामुळे पचनसंस्था बिघडण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात पाणी पिताना नेहमी साधं पाणी प्यावे. थंड किंवा गरम पाण्याचे सेवन करू नये. जेवल्यानंतर लगेच पाणी न पिताजेवल्यानंतर अर्धा तासाने पाण्याचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यामुळे रात्रभर पोटतात राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते.
हृदयाला आरामाची गरज असल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही ‘लक्षणे, वेळीच सावध होऊन हृदयाची घ्या काळजी
नियमित 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. पाण्यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. वय, वजन लिंग, फिजिकल अॅक्टिविटी आणि वातावरणावरइत्यादी गोष्टींवर अवलंबून असते की नियमित पाण्याचे किती सेवन यावर अवलंबून असते. जास्त घाम किंवा एक्सरसाईज करत असाल तर जास्त पाण्याचे सेवन करावे. जर तुम्ही कोणत्या आजारावर गोळ्या औषध खात असाल तर पाण्याचे भरपूर पाण्याचे सेवन करावे.