शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. कधी कडक ऊन तर कधी अचानक पडत असलेल्या पाऊसामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. या दिवसांमध्ये आजारपण वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. कडक उन्हाळ्यात अंगातून सतत घामाच्या धारा वाहू लागतात. घामाच्या धारा वाहू लागल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. कारण शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता शरीरासाठी अतिशय घातक आहे. यामुळे डिहायड्रेशन किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताक किंवा दह्यापासून बनवलेले पदार्थ खाण्यावर जास्त भर द्यावा. कारण उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे पोटात वारंवार आग होणे, उलट्या किंवा जुलाब होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये थंड पदार्थांचे सेवन करावे. नियमित एक ग्लास ताक प्यायल्यामुळे शरीरात थंडावा कायम टिकून राहतो. याशिवाय शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवत नाही. दह्यापासून तुम्ही ताक, दही, लस्सी किंवा इतरही पदार्थ बनवून खाऊ शकता.
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधरण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित सातूच्या सरबताचे सेवन करावे. हे सरबत आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. याशिवाय यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक ठरतात. एक ग्लास पाण्यात सातूचे पीठ घेऊन मिक्स करावे. हे सरबत लहान मुलांना नियमित पिण्यास दिल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.
दैनंदिन आहारात तूप, साय, लोणी, ताक, पनीर, खीर इत्यादी द्रव पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. थंड पदार्थ शरीरातील उष्णता कमी करून पोटात गारवा निर्माण करतात. त्यामुळे रोजच्या आहारात नेहमी दही खावे. याशिवाय काकडी, बीट, गाजर इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.
हंगामी फळांचे किंवा भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते. या फळांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.आंबा, केळी, कलिंगड,अननस, फणस, जांभूळ, करवंद, बोर, चिंचा, आवळा, चिकू इत्यादी फळांचे रोजच्या आहारात सेवन करावे. याशिवाय आहारात डाळ, भात, कढी, पालेभाज्या, टोमॅटो इत्यादी विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे.