शरीराचा वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित करा 'या' फळाचे सेवन
चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, पचनाची समस्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे कॅन्सर, रक्तदाब, वाढते कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक, मधुमेह आणि आरोग्यासंबंधित इतर आजार होण्याची शक्यता असते. जगभरात गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. सतत चहा कॉफी, मद्यपान, दारूचे सेवन इत्यादी हानिकारक पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक नकारात्मक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. हल्ली ९० टक्के तरुणाईला उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू लागली आहे. शरीरात वाढलेली रक्तदाब आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. रक्तदाब वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांसंबंधित समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
शरीराचा वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित एक केळ खावं. केळी खाल्यामुळे पचनासंबंधित समस्या सुद्धा दूर होतात. वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरसुद्धा आहारात एक केळ खाण्याचा सल्ला देतात. केळ्यांमध्ये भरपूर पोषक घटक आणि पोटॅशियम आढळून येते. शरीरात मिठाचे प्रमाण वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण मिठाचे प्रमाण कमी करण्याऐवजी रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय शरीरात पोटॅशियमचे पातळी वाढल्यानंतर रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या वेळी केळी खावीत? केळी खाण्याचे नेमके काय फायदे आहेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात केळ्याचे सेवन करावे. केळी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. कारण केळ्यांमध्ये भरपूर पोटॅशियम आढळून येते. पोटॅशियमयुक्त पदार्थांचे रोजच्या आहारात नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. कारण केळ्यामध्ये 422 मिलीग्रॅम पोटॅशियम आढळून येते. केळी खाल्यामुळे रक्तवाहिन्यांवर वाढलेला तणाव कमी होतो.दैनंदिन आहारात केळी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी खावीत. कोणत्याही चुकीच्या वेळी केळ्यांचे सेवन करू नये.
दैनंदिन आहारात केळ्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले पोटॅशियममुळे उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते. याशिवाय शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात नियमित केळी खावी. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी रोजच्या आहारात केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले पौष्टिक घटक आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरतात. हृदय, मूत्रपिंड, स्नायू आणि नसा इत्यादी अवयवांसाठी केळी अतिशय गुणकारी ठरतात.






