सुधा मूर्ती जेवणानंतर नियमित करतात 'या' हलक्या फुलक्या पदार्थांचे सेवन
जगभरात सगळीकडे सुधा मूर्तींचे नाव प्रसिद्ध आहे. त्यांचे राहणीमान अतिशय साधे असले तरी त्यांचे कर्तृत्व खूप मोठे आहे. दैनंदिन जीवनात त्यात अतिशय साध्या व्यक्तींप्रमाणे राहतात. त्यांचे राहणीमान, बोली भाषा अतिशय साधी सिंपल आहे. सुधा मूर्ती यांचा साधेपणा त्यांच्या राहणीमानातून लगेच दिसून येतो. सोशल मीडिया, युट्युब किंवा इतर ठिकाणी त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध आहेत. त्या उपस्थित नागरिकांशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत असतात. काही दिवसांआधी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या फिटनेसचे सिक्रेट, डाएट, वजन आणि आहाराबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. सोशल मीडियावर घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्यासोबत सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यासुद्धा होत्या.(फोटो सौजन्य – iStock)
सोशल मीडियावरील मुलाखतीमध्ये बोलताना सुधा मूर्ती म्हणाल्या, खाण्याच्या बाबतीमध्ये आपली नाळ मातीशी जोडलेली असते, ती अजिबात सोडायची नाही. जे पदार्थ आपल्या मातीमध्ये उगवतात, ते पदार्थ आपल्या घरात खूप पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीने खाल्ले जातात. हे अन्नपदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. याशिवाय सुधा मूर्ती अजूनही रोजच्या आहारात नियमित ज्वारीच्या भाकरीचे सेवन करतात. ज्वारीच्या भाकरीचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे.
रोजच्या आहारात ज्वारीची भाकरी जेवणाच्या ताटात असेल तर मन आनंदाने भरून जाते. याशिवाय या आठवणी थेट बालपणामध्ये घेऊन जातात. सुधा मूर्ती दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाल्यानंतर नियमित सुखे पोहे खातात. जेवण झाल्यानंतर त्यात नियमित ४ चमचे सुखे पोहे खातात. सुधा मूर्ती म्हणाल्या, सुखे पोहे खाणे म्हणजे स्वर्गसुखचं. पोहे खायला वजन वाढते किंवा कॅलरीज वाढते असे काही नाही, पण सुखे पोहे खाल्ल्यानंतर मनाला आंनद होतो. याशिवाय तोच आनंद आयुष्यात अतिशय महत्त्वाचा आहे.
कायम तरुण आणि चमकदार त्वचेसाठी दैनंदिन आहारात करा ‘या’ फळाचे सेवन, गाल दिसतील गुबगुबीत
सुधा मूर्तीनी मुलाखतीमध्ये बालपणातील एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. त्या म्हणाल्या, लहानपाणी आम्हाला सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा लग्न कार्यात गोड पदार्थ खायला मिळत होते. त्यावेळी आईला नेहमी आम्ही एकच प्रश्न विचारायचो की आपण रोज गोड पदार्थ का खात नाही? मात्र त्या प्रश्नाची उत्तर मला आज मिळत आहेत. रोज गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे आजारपण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात सगळ्यांचं पदार्थांचा आनंद मर्यादित प्रमाणात घेणे आवश्यक आहे, असा गोड सल्ला त्यांनी सगळ्यांचं दिला आहे.