शरीरात निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' लाडूचे करा सेवन
धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. कुटुंबिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध इत्यादी अनेक गोष्टीमुळे काहीवेळा आरोग्याकडे दुर्लक्ष होते. शरीरात कोणत्याही विटामिनची कमतरता निर्माण झाल्यास शरीराला हानी पोहचते. त्यामुळे सर्वच विटामिनची पातळी संतुलित असणे आवश्यक आहे. याशिवाय आहारात मांसाहारी पदार्थांचे सेवन न करणाऱ्या लोकांच्या शरीरात प्रामुख्याने प्रोटीनची कमतरता उद्भवते. त्यामुळे प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी शाहाकारी लोकांनी आहारात काय खावे? कोणते पदार्थ खाल्यामुळे प्रोटीन वाढेल? असे अनेक प्रश्न कायमच पडतात. दैनंदिन आहारात योग्य प्रमाणात पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात कधीही पोषणाची कमतरता उद्भवणार नाही. आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.दिवसभरातून एक लाडू खाल्यास शरीराला भरपूर पोषण मिळेल. जाणून घ्या लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)