भारतातील वाढत्या संधिवाताच्या समस्ये संदर्भात रोबोटिक सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी समान विमा संरक्षणाची मागणी
क्रॉनिक रोगांशी लढण्यासाठी भागीदारी (The Partnership to Fight Chronic Disease – PFCD) या संस्थेने मुंबईमध्ये प्रमुख अस्थिरोग तज्ज्ञांचे (Orthopaedic Surgeons) एक पॅनेल आयोजित केले होते. यामध्ये डॉ. मुदित खन्ना (सल्लागार सांधे बदल शस्त्रक्रिया तज्ज्ञ, वोक्हार्ट रुग्णालय), डॉ. मिलिंद पाटील (अस्थिरोग तज्ज्ञ, रिव्हायवल बोन अँड जॉइंट रुग्णालय) आणि प्रा. डॉ. प्रदीप बी. भोसले (प्रिन्सिपल डायरेक्टर – रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट, हिप अँड नी सर्जरी, नानावटी मॅक्स रुग्णालय) यांचा समावेश होता. या कार्यक्रमात भारतात वाढत चाललेल्या संधिवाताच्या समस्येबद्दल आणि रोबोटिक पद्धतीने सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रियेला सर्वांना समान विमा संरक्षण मिळावे याबद्दल चर्चा करण्यात आली.
डॉ. मिलिंद पाटील म्हणाले: “रोबोटिक सांधे बदलणे आता प्रायोगिक (experimental) राहिलेले नाही – हे एक स्थिर आणि विश्वासार्ह तंत्रज्ञान पद्धत बनली आहे. या तंत्रज्ञानाचा २० वर्षांहून अधिक काळ वैद्यकीय वापर होत आहे, आणि ४५ देशांमध्ये ते स्वीकारले गेले आहे. जगभरात १.५ दशलक्षाहून अधिक अशा शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. २०२५ मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे ४१% प्राथमिक गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रिया रोबोटिक होत्या. अंदाजानुसार, २०३० पर्यंत अमेरिकेत सुमारे ७०% अशा प्रक्रिया रोबोटिक असतील. असे असूनही, मी पाहिले आहे की, अनेक कुटुंबांना विम्याची पूर्ण मदत मिळेपर्यंत शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यास भाग पाडले जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनातील निर्णयांवर आणि संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणावर परिणाम होतो.”
डॉ. मुदित खन्ना म्हणाले: “जो रुग्ण जलद आणि अचूक उपचारासाठी रोबोटिक सांधे बदलण्याची निवड करतो, त्याला विमा मिळण्यापासून वंचित ठेवू नये. जर ते अतिरिक्त खर्च स्वतः भरण्यास तयार असतील, तरीही विमा कंपन्यांनी पारंपारिक सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी लागू होणारी प्रमाणित रक्कम (standard amount) देणे आवश्यक आहे. अधिक सुरक्षित, अधिक प्रगत काळजी मिळवण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही रुग्णाला दंडित केले जाऊ नये. रुग्णांना ‘उत्तम काळजी’ आणि ‘विमा संरक्षण’ यापैकी एक निवड करण्याची वेळ येऊ नये. प्रत्येकाला अतिरिक्त किंमत न मोजता सर्वोत्तम उपचार मिळण्याचा अधिकार आहे.”
पॅनेलने यावर जोर दिला की, विमा कंपन्यांनी रोबोटिक तंत्रज्ञानाचे दीर्घकालीन फायदे ओळखायला हवेत. जसे की कमी पुनरावृत्ती शस्त्रक्रिया, रुग्णालयात पुन्हा दाखल होण्याची कमी आवश्यकता, जलद बरे होणे आणि कामावर लवकर परतणे यांचा सामावेश आहे. सुरुवातीला खर्च जास्त दिसत असला तरी, हे तंत्रज्ञान रुग्ण, विमा कंपन्या आणि आरोग्यसेवा यंत्रणेसाठी मोठी बचत करण्यास मदत करते.
प्रा. डॉ. प्रदीप बी. भोसले म्हणाले: “विमा कंपन्यांनी फक्त शस्त्रक्रियेचा तात्काळ खर्च पाहू नये. त्यांनी रोबोटिक प्रक्रियेचे दीर्घकालीन फायदेही ओळखायला हवेत. सर्वसमावेशक विमा संरक्षणामुळे केवळ रुग्णांनाच फायदा होत नाही, तर नंतरच्या आरोग्यसेवा खर्चामध्ये कपात करून आणि जागतिक स्तरावरील काळजीसाठी समान उपलब्धता सुनिश्चित करून विमा कंपन्यांनाही मदत होते. जर शस्त्रक्रिया अपयशी झाली, तर ती पुन्हा करावी लागल्यास सुरुवातीच्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत दोन ते सहा पट जास्त खर्च होऊ शकतो. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे इम्प्लांटेशन अधिक अचूक होते, त्यामुळे अपयश कमी होते आणि दीर्घकालीन बचत होते.”
अमन गुप्ता, जे पार्टनरशिप टू फाईट क्रॉनिक डिजीज (PFCD) चे आशिया प्रतिनिधी आहेत, त्यांनी रुग्ण-केंद्रित धोरणावर (patient-centric mission) जोर दिला: “पार्टनरशिप टू फाईट क्रॉनिक डिजीज (PFCD) मध्ये, आमचे लक्ष आहे की, आर्थिक अडचणींमुळे कोणताही रुग्ण मागे राहू नये. आम्ही अशा विमा धोरणांचे समर्थन करतो जे रोबोटिक सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रियेला वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक आणि मूल्य-आधारित नवकल्पना म्हणून ओळखतात, ज्यामुळे जागतिक दर्जाची काळजी समान पद्धतीने उपलब्ध होते आणि संधिवात असलेल्या रुग्णांचे जीवनमान सुधारते.”
भारतात जवळजवळ ६ कोटी (६० दशलक्ष) लोकांना संधिवाताचा त्रास आहे, तरीही त्यापैकी १०% पेक्षाही कमी लोकांची सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया होते. आज जगभर वापरले जाणारे आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही, लाखो लोक तीव्र वेदना आणि अपंगत्वामध्ये जीवन जगत आहेत. भारताला एका गंभीर आव्हानाचा सामना करावा लागत आहे – रोगाचा मोठा भार, उपचारांना होणारा विलंब आणि प्रगत उपचारांसाठी मर्यादित उपलब्धता. पॅनेलने यावर जोर दिला की रुग्णांना जीवन बदलणारी ही काळजी मिळण्यापासून रोखणारा सर्वात मोठा अडथळा वैद्यकीय मर्यादा नसून, विमा संरक्षणातील तफावत आहे.
रोबोटिक-सहाय्यित सांधे बदल शस्त्रक्रिया (Robotic-assisted joint replacement) ज्यामध्ये ऑपरेशन खूप अचूकपणे, कमी वेळेत आणि उत्तम परिणामांसह केले जाते. सीटी स्कॅनच्या आधारे केलेले नियोजन (CT-based planning) सर्जनला प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट शरीररचनेनुसार प्रक्रिया समायोजित करण्यास, शरीररचनेतील आव्हाने अगोदरच ओळखण्यास, मानवी शस्त्रक्रियेतील चुका कमी करण्यास आणि निरोगी ऊती (tissue) सुरक्षीत ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे सांध्याचे कार्य सुधारते आणि दीर्घकालीन परिणाम चांगले मिळतात. हे तंत्रज्ञान विशेषतः ज्या रुग्णांच्या सांध्यात जास्त झीज किंवा विकृती आहे, त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. असे असूनही, मर्यादित विमा संरक्षणामुळे अनेकदा रुग्णांना रोबोटिक उपचाराचा लाभ घेता येत नाही, ज्यामुळे उपचारांच्या निर्णयांवर परिणाम करणारे आर्थिक अडथळे निर्माण होतात.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने २०१९ मध्ये विमा कंपन्यांना त्यांच्या योजनांमध्ये आधुनिक उपचारांचा समावेश करण्याचे निर्देश देऊन एक महत्त्वाचे पाऊल उचलले. असे असूनही, रोबोटिक-सहाय्यित प्रक्रियांचे विमा संरक्षण वेगवेगळ्या योजनांनुसार बदलते, त्यामुळे रुग्णांना त्यांच्या उपचारांचे पर्याय आणि खर्च किती परवडणारे आहेत हे ठरवणे कठीण जाते. सब-लिमिट्स (विम्यात ठरवलेली रक्कम मर्यादा) किंवा दाव्यांवरील मर्यादा (caps on claims) यांसारखे आर्थिक अडथळे, रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे सिद्ध झालेले असतानाही, अनेकदा रुग्णांना हा उपचार निवडण्यापासून थांबवतात.
पार्टनरशिप टू फाईट क्रॉनिक डिजीज (PFCD) कंपनी स्ट्रायकर (Stryker) ला जागरूकता भागीदार म्हणून घेऊन संपूर्ण भारतात संधिवातासारख्या जुनाट रोगांसाठी रुग्णांना समान सेवा मिळवून देण्यासाठी काम करत आहे. प्रत्येक व्यक्तीला रोबोटिक सांधे बदलणे यांसारख्या प्रगत वैद्यकीय सेवेची समान उपलब्धता असावी, कारण यामुळे केवळ रुग्णांचे परिणाम सुधारतात असे नाही, तर संपूर्ण आरोग्य सेवा परिसंस्था (healthcare ecosystem) देखील मजबूत होते.