(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आर्यन खान दिग्दर्शित “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या वेब सिरीजमध्ये वानखेडेच्या भूमिकेबद्दल शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्सविरुद्ध एनसीबीचे एक्स अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी, ८ ऑक्टोबर रोजी समन्स जारी केले. त्यांना ७ दिवसांपर्यंत हजर होण्यास सांगितले आहे. तसेच आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
पुढील सुनावणी कधी होणार?
न्यायालयाने रेड चिलीज, नेटफ्लिक्स, एक्स (पूर्वीचे ट्विटर), गुगल, मेटा आणि इतर कंपन्यांना सात दिवसांच्या आत त्यांचे उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. वानखेडे यांनी २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे, जी ते टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की ही मालिका ड्रग्ज विरोधी संस्थांना नकारात्मक पद्धतीने दाखवते, ज्यामुळे कायद्यावरील जनतेचा विश्वास कमी होतो.
Delhi High Court issued summons (notice) on the plea of Sameer Wankhede against Red Chillies Entertainment and others. The High Court has asked Red Chillies Entertainment and others to file a reply within 7 days. The court has asked the petitioner to supply a copy of the petition… — ANI (@ANI) October 8, 2025
याचिकेचा आधार काय आहे?
याचिकेत असेही म्हटले आहे की ही मालिका जाणूनबुजून वानखेडे यांची प्रतिमा खराब करण्यासाठी तयार करण्यात आली होती, विशेषतः शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्याशी संबंधित एक खटला न्यायालयात प्रलंबित असत. न्यायालयाने अद्याप कोणताही अंतरिम आदेश जारी केलेला नाही आणि काही वेबसाइटवरून कथितपणे आक्षेपार्ह सामग्री काढून टाकण्याच्या वानखेडे यांच्या मागणीवर उत्तर मागितले आहे.
Rajvir Jawanda Death: पंजाबी गायक राजवीर जवंदाचे निधन, ११ दिवस व्हेंटिलेटरवर; हरला मृत्यूची झुंज
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दिल्ली उच्च न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात शाहरुख खान, त्यांची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स यांना नोटीस बजावल्या आहेत. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी हा खटला दाखल केला आहे, ज्यांनी आरोप केला आहे की “द बॅडीज ऑफ बॉलीवूड” या वेब सिरीजमध्ये त्यांची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे.