स्वयंपाक घरातील 'या' पदार्थाचे सेवन केल्यास कधीच होणार पित्ताचा त्रास
हल्ली हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक आल्यानंतर योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे धावपळीच्या जीवनातसुद्धा आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हार्ट अटॅक, कार्डिअक अरेस्ट, ब्लॉकेज इत्यादी गंभीर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. आहारात कोणत्याही पदार्थांचे सेवन, सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे, जंक फूड, व्यायामाचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींच्या कमतरतेमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.हृद्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. त्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांपासून कायमच दूर राहण्यासाठी आहारात आल्याचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना आल्याचा वापर केला जातो. आलं लसूण पेस्ट टाकल्यामुळे पदार्थाची चव आणखीनच वाढते आणि खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे वारंवार चहा कॉफीचे सेवन करण्याऐवजी आल्याच्या रसाचे सेवन करावे. आल्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि पोट स्वच्छ होत. आज आम्ही तुम्हाला आल्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या रसाचे सेवन करावे. यासाठी आलं किसून त्यातील रस काढावा आणि त्यात मध मिक्स करून खावे. आल्याचा रस प्यायल्यानंतर काही मिनिटांनी कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच आतड्यांमधील घाण सुद्धा स्वच्छ होते. ४५ दिवस नियमित सुकलेल्या आल्याची पावडर खाल्ल्यास शरीरात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल स्वच्छ होण्यास मदत होईल. शरीरसंबंधित उद्भवलेल्या गंभीर समस्या केवळ गोळ्या औषधाने नाहीतर घरगुती उपाय करून सुद्धा बऱ्या होतात.
हृदयात साचून राहिलेल्या उच्च कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्या कमकुवत होऊन जातात. कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होतो, ज्याला ‘क्रॉनिक इन्फ्लेमेशन’ असे सुद्धा म्हणतात. यामुळे हृदयाला सूज येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आल्याचे सेवन केल्यास रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि जिंजरॉल्स आणि शोगॉल्स सूज कमी करण्यास मदत करतात. रक्तवाहिन्यांमधील लवचिकता कायम टिकून राहण्यासाठी आल्याच्या रसाचे सेवन करावे.
रक्तात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आल्याचा रस प्यायला जातो. याशिवाय शरीरात वाढलेली ऍसिडिटी, अपचन आणि गॅस कमी करण्यासाठी आल्याचा रस प्यावा किंवा आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतील. सकाळच्या चहामध्ये, स्मूदी, रस किंवा हर्बल टी बनवताना तुम्ही आल्याचा वापर करू शकता.
कोलेस्टेरॉल म्हणजे काय?
रक्तात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होतो, ज्यामुळे त्या अरुंद होतात आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते.
उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय:
संतृप्त चरबी (saturated fat) आणि ट्रान्स फॅट्सचे (trans fats) सेवन कमी करा. धावणे, जॉगिंग करणे यासारख्या व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते आणि कोलेस्टेरॉल कमी होते. फळे, भाज्या आणि नट्स यांसारख्या विरघळणाऱ्या फायबर (soluble fiber) युक्त पदार्थांचे सेवन वाढवा.