कडीपत्ता तुळस या वनस्पतींना औषधी वनस्पती आहे. या वनस्पतींचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. तुळस जशी आरोग्यासाठी गुणकारी आहे, तसाच कढीपत्ता देखील तितकाच गुणकारी आहे. कढीपत्त्याचा चहा देखील बनवला जातो आणि तो आरोग्यासाठी उपयुक्त असतो. कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, अशा प्रकारची पोषक घटक असतात. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.
चहा बनवण्यासाठी २० ते २५ ताजी कढीपत्ता पाने घ्या, ती पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर चहाच्या भांड्यात एक कप पाणी घाला आणि ते पाणी गॅसवर उकळा. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता पाने टाका आणि ती थोडावेळ झाकून ठेवा. तुम्हाला चहात गोडवा हवाच असल्यास थोडासा गुळ वापरा पण साखरेचा वापर टाळा. काही वेळ चहा गॅसवर उकळा त्यानंतर पाण्याचा रंग बदलेल आणि मग तुम्ही आरोग्यदायी असा चहा प्या आणि निरोगी रहा.
कढीपत्ता आपल्या त्वचेसाठीही उपयुक्त आहे. त्याचा वापर केल्याने त्वचा तेजस्वी होते सोबतच मुरुमांचा त्रास देखील दूर होतो. कढीपत्त्याच्या पानांमध्ये उच्च पातळीचे फिनॉलिक्ससह अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे मुक्त रॅडिकल्समुळे त्वचेचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त असतात.जर तुम्ही कढीपत्त्याच्या पानांचा चहा पिला तर हा चहा रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही, तो चहा साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. कढीपत्त्याच्या चहाचे सेवन हे गरोदरपणातही केलं जाऊ शकतं. हा चहा पिल्याने तुम्हाला होणारा उलट्या, मळमळ, मॉर्निंग सिकनेस यासारख्या समस्यांचा त्रास जाणवणार नाही. शिवाय हा चहा प्रवासापूर्वी आणि प्रवासादरम्यान पिला तरी प्रवासात थकवा येणार नाही आणि उलट्यांचा त्रास देखील होणार नाही. कढीपत्त्याचा सुगंध हा मज्जातंतूंना आराम देण्यास मदत करू शकतो.