फोटो सौजन्य - Social Media
कोकणातल्या दापोली तालुक्यात धोंडीबाचा वाडा म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हा वाडा प्रसिद्ध आहे येते घडणाऱ्या विचित्र घटनांमुळे! असं म्हणतात की काही वर्षांपूर्वी येथे धोंडिबा त्याच्या कुटुंबासह राहत होता. धोंडीबाच्या मुलीचे लग्न होते. धोंडीबाने दारूच्या नशेत आपल्या आयुष्यातील सगळी काही कमाई गमावलेली होती. जुगाराच्या नादात गुंतलेल्या धोंडीबाच्या लेकीने स्वकमाईच्या पैशांनी स्वतःचे लग्न रचले. त्यावेळी हुंड्याचा प्रकार अफाट होता.
बाप हुंड्याचे पैसे देत नसल्याने तसेच मानपानात कमतरता जाणवल्याने भर मांडवात नवऱ्याकडची मंडळी लग्न तोडून निघून जातात. लग्नाच्या या दिवशीदेखील धोंडिबा दारू पिऊन तमाशा करत असतो. शेवटी, तणावात येवून धोंडीबाची मुलगी भर मांडवात स्वतःला जाळून घेते. यानंतर वाड्यात एकटा राहणारा धोंडीबाचे ही अगदी काही दिवसात अल्पशा आजाराने मृत्यू होते. तेव्हापासून ya वाड्यात ना कुणी जात, ना कुणी फिरकत! असे म्हणतात की या वाड्यातून रात्रीच्या सुमारास सनईचे सूर गुंजतात आणि एक वधूच्या वेशात एक आत्मा तिथे वास करते.
मुंबईतून रमेश आणि रुपेश, हे दोन भाऊ गावी आले होते. त्यांनी या वाड्याविषयी फार ऐकलं असत. पण शेवटी, शहरीराहणीमानत वाढलेले दोघांना यासर्व गोष्टींवर विश्वास नाही. या सगळ्या निव्वळ अफवा हे सिद्ध करण्यासाठी दोघेजण मध्यरात्रीच्या सुमारासच त्या वाड्याकडे जातात. वाड्याच्या गेटवरच त्यांना काळोखी शुकशुकाट जाणवतो. घराच्या आत जाताच आत सगळीकडे धूळ असते. सगळीकडे घाण आणि पसारा असतो.
आत जाईपर्यंत दोघांना फार काही जाणवत नाही. पण आतल्या काळोखी अंधारात त्यांना कुणाचा तरी आभास होतो. वधूच्या वेशात त्यांच्यासमोर एक भूत उभं राहत. ते पाहून दोघांचा थरकाप उडतो. दोघे अगदी घाईघाईत दाराच्या दिशेने धावत सुटतात. पण इतक्यात दार बंद होते. त्यांच्या कानावर बँड बाजे आणि सनईचे सूर पडतात. हा आवाज हळहळू इतका कर्कश होत जातो की ऐकण्याच्या क्षमतेच्या बाहेर जातो. अखेर त्या आवाजाने दोघे बेशुद्ध होऊन खाली पडतात. सकाळी ते दोघे त्या वाड्याच्या बाहेर बेशुद्ध अवस्थेत भेटतात.