१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
१९६८: जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.
१९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.
१९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.
१८८२: ब्रिटनच्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या.
१९७३: चंद्र शेखर येलेती – भारतीय संचालक आणि पटकथालेखक
१९३८: आनंद मोहन चक्रबर्ती – भारतीय-अमेरिकन सूक्ष्मजीवविज्ञानी आणि संशोधक (निधन: १० जुलै २०२०)
१९३३: बापू नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज
१९३२: जयंती पटनायक – राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा (निधन: २८ सप्टेंबर २०२२)
१९३०: निळू फुले – हिंदी मराठी चित्रपट अभिनेते (निधन: १३ जुलै २००९)
१९२३: पी. के. मुकिया तेवर – ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष (निधन: ६ सप्टेंबर १९७९)
१९०२: पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (निधन: १ एप्रिल १९८४)
१८९३: फ्रेड नूनन – अमेरिकन फ्लाइट नेव्हिगेटर (निधन: २० जुन १९३८)
१८४२: एडवर्ड लुकास – फ्रेंच गणिती (निधन: ३ ऑक्टोबर १८९१)
१८२३: सर कार्ल विल्हेम सीमेन्स – जर्मन-ब्रिटिश अभियंते (निधन: १९ नोव्हेंबर १८८३)
२०००: वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर – कलादिग्दर्शक
१९९६: आनंद साधले – साहित्यिक (जन्म: ५ जुलै १९२०)
१९८४: ओलेग अँतोनोव्ह – रशियन विमानशास्त्रज्ञ आणि अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक (जन्म: ७ फेब्रुवारी १९०६)
१९६८: मार्टिन ल्युथर किंग – गांधीवादी नेते – नोबेल पुरस्कार (जन्म: १५ जानेवारी १९२९)
१९३१: आंद्रे मिचेलिन – मिचेलीन टायर्स कंपनीचे संस्थापक (जन्म: १६ जानेवारी १८५३)
१९२९: कार्ल बेंझ – मर्सिडीज-बेंझ कंपनीचे सह-संस्थापक, ऑटोमोबाईल उद्योगाचे जनक (जन्म: २५ नोव्हेंबर १८४४)
१९२३: जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (जन्म: ४ ऑगस्ट १८३४)
१८९२: जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ – कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती (जन्म: १ सप्टेंबर १८१८)
१८४१: हेन्री हॅरिसन – अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम (जन्म: ९ फेब्रुवारी १७७३)
१६१७: जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक
१५०३: अन्नामचार्य – हिंदू संत (जन्म: २२ मे १४०८)