ता. : 9 – 11 – 2023 गुरुवार
तिथी: एकादशी
मिती: राष्ट्रीय मिति 18, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी 10:41. नंतर द्वादशी
सूर्योदयकालीन नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 21:56, नंतर हस्त, योग – वैधृति 16:46, नंतर विष्कंभ, करण- बालव 10:41,नंतर कौलव 23:41, पश्चात तैतिल
सूर्योदय : 6:30 सूर्यास्त : 5:41
शुभ रंग : जांभळा, पिवळा, निळा, गुलाबी
शुभ अंक : 3, 6, 9
शुभ रत्न: गुरुसाठी पुष्कराज
दिनविशेष 9 नोव्हेंबर – घटना
कायदाविषयक सेवा दिन
2000: उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना.
1997: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार प्रदान.
1988: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत 12 जण मृत्युमुखी.
1967: रोलिंग स्टोन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
1965: इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बऱ्याच भागाचा वीजपुरवठा 12 तास खंडित झाला.
दिनविशेष 9 नोव्हेंबर – जन्म
1984: एल्युड किपचोगे – केनियन धावपटू, 1:59:40 या वेळेसह दोन तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन धावणारे पहिले व्यक्ती
1980: पायल रोहतगी – अभिनेत्री व मॉडेल
1944: चितेश दास – भारतीय कोरिओग्राफर
1934: कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक
1931: लक्ष्मी मल सिंघवी – भारतीय कायदेपंडित, विद्वान आणि मुत्सद्दी – पद्म भूषण
दिनविशेष 9 नोव्हेंबर – निधन
2011: हर गोबिंद खुराना – भारतीय-अमेरिकन जैव रसायनशास्त्रज्ञ – पद्म विभूषण, नोबेल पुरस्कार
2005: के. आर. नारायणन – भारताचे दहावे राष्ट्रपती
2003: विनोद बिहारी वर्मा – मैथिली भाषेतील लेखक व कवी
2000: एरिक मॉर्ले – मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते
1977: केशवराव भोळे – गायक, अभिनेते, संगीत समीक्षक आणि दिग्दर्शक