ता: 26 -7 – 2023, बुधवार
तिथी: अष्टमी
मिती: राष्ट्रीय मिति 4, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, अधिक श्रावण शुक्ल पक्ष अष्टमी 15.51
सूर्योदयकालीन नक्षत्र : स्वाती 25.09, योग – साध्य 14.37, नंतर शुभ, करण- बव 15.51, नंतर बालव 27.55,पश्चात कौलव.
सूर्योदय: 5.38 सूर्यास्त :7.15
शुभ अंक :5, 1, 4
शुभ रत्न:बुधासाठी पन्ना
शुभ रंग: पांढरा, ग्रे
दिनविशेष -कारगिल विजय दिन
26 जुलै घटना
2016: सोलार इम्पल्स 2 हे पृथ्वीभोवती फिरणारे पहिले सौर उर्जेवर चालणारे विमान ठरले.
2008: अहमदाबाद बॉम्बस्फोट – या हल्ल्यात किमान 56 लोकांचे निधन तर 200 पेक्षा जास्त लोक जखमी.
2005: स्पेस शटल प्रोग्राम – STS-114 मिशन: डिस्कवरी उपग्रहाचे प्रक्षेपण.
2005: मुंबई ढगफुटी – 24 तासांत 99.5 सेंटीमीटर (39.17 इंच) पाऊस पडला, परिणामी पुरामुळे किमान 5,000 लोकांचे निधन.
1994: उस्ताद बिस्मिला खान – यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर.
1975: लिझ ट्रस – युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान
1971: अपोलो कार्यक्रम – अपोलो 15 चे प्रक्षेपण करण्यात आले.
1965: मालदीव देशाला युनायटेड किंग्डम आणि इंग्लंडपासून स्वातंत्र्य.
1963: सिन्कॉम 2 जगातील पहिला जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
1963: स्कोप्जे, युगोस्लाव्हिया भूकंप – येथे झालेल्या भूकंपात किमान 1100 लोकांचे निधन.
1963: आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (OECD) जपानला मान्यता देण्यास मत दिले.
1963: सिनकॉमया या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
1958: एक्सप्लोरर फोर प्रक्षेपित करण्यात आले.
1956: इजिप्त – सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण.
1953: 26जुलै क्रांती – फिडेल कॅस्ट्रो यांनी मोनकाडा बॅरेक्सवर अयशस्वी हल्ला केला, येथूनच क्यूबन क्रांतीची सुरुवात झाली.
1945: दुसरे महायुद्ध – पॉट्सडॅम घोषणेवर स्वाक्षरी झाली.
1944: दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने युक्रेनमधील ल्विव्ह हे प्रमुख शहर काबीज केले.
1941: दुसरे महायुद्ध – ग्रँड हार्बरची लढाई: ब्रिटीश सैन्याने इटालियन सैन्याने केलेला हल्ला नष्ट केला.
1941: दुसरे महायुद्ध – जपानने फ्रेंच इंडोचायनाचा ताबा घेतल्यामुळे, अमेरिका, ब्रिटन आणि नेदरलँड्स या देशांनी सर्व जपानी मालमत्ता गोठवली आणि तेलाची वाहतूक बंद केली.
1937: स्पॅनिश गृहयुद्ध – राष्ट्रवादी गटाच्या विजयासह ब्रुनेटेच्या लढाईचा शेवट.
1936: स्पॅनिश गृहयुद्ध – जर्मनी आणि इटली देशांनी फ्रान्सिस्को फ्रँको आणि राष्ट्रवादी गटाच्या समर्थनार्थ युद्धात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला.
1892: दादाभाई नौरोजी – ब्रिटनमधील पहिले भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले.
1891: फ्रान्स – देशाने ताहिती बेटे ताब्यात घेतली.
1847: लायबेरिया – देशाने स्वातंत्र्य घोषित केले.
1814: स्वीडिश-नॉर्वेजियन युद्ध – सुरू झाले.
1803: सरे आयर्न रेल्वे – जगातील पहिली सार्वजनिक रेल्वे, लंडन, युनायटेड किंगडम येथे सुरु.
1788: अमेरिका – न्यूयॉर्क अमेरिकेचे 11वे राज्य बनले.
1758: फ्रेंच आणि भारतीय युद्ध – ब्रिटीश सैन्याने फ्रेंच सैन्याचा पराभव करून सेंट लॉरेन्सच्या आखातावर ताबा मिळवला. लुईसबर्गचा वेढा संपला.
1745: पहिला महिला क्रिकेट सामना – गिल्डफोर्ड, इंग्लंड येथे खेळण्यात आल्याचे नोंद करण्यात आले.
1509: विजयनगर साम्राज्य – सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.
26 जुलै जन्म
1986: मुग्धा गोडसे – अभिनेत्री मॉडेल
1971: खलिद महमूद – बांगलादेशी क्रिकेटपटू
1955: आसिफ अली झरदारी – पाकिस्तानचे 11वे राष्ट्राध्यक्ष
1954: व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू
1949: थाकसिन शिनावात्रा – थायलंडचे पंतप्रधान
1942: व्लादिमिर मेसियर – स्लोव्हेकियाचे पंतप्रधान
1939: जॉन हॉवर्ड – ऑस्ट्रेलियाचे 25वे पंतप्रधान
1927: गुलाबराय रामचंद – भारतीय क्रिकेट खेळाडू
1894: अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक
1894: वासुदेव गोविंद मायदेव – कवी समाजसेवक
1893: पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक
1875: कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ
1865: रजनीकांत सेन – भारतीय कवी आणि संगीतकार
1856: जॉर्ज बर्नार्ड शॉ – आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक – नोबेल पारितोषिक
26 जुलै निधन
811: निसेफोरस – बायझेन्टाईन सम्राट
2015: बिजॉय कृष्णा हांडिक – भारतीय वकील आणि राजकारणी
2010: शिवकांत तिवारी – भारतीय सिंगापुरियन राजकारणी
1952: एव्हा पेरोन – अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी
1891: राजेन्द्रलाल मित्रा – प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष
1867: ओट्टो – ग्रीसचा राजा
1843: सॅम ह्युस्टन – टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष
1380: कोम्यो – जपानी सम्राट