सोड्याचा वापर न करता दिवाळीनिमित्त घरी बनवा कुरकुरीत आलू भुजिया शेव
दिवाळीला सगळीकडे आनंद असतो. अंगणात सुंदर रांगोळी काढून दिवे लावले जातात. तसेच घरात वेगवेगळे फराळातील पदार्थ बनवले जातात. दिवाळीला घरात चिवडा, करंजी, लाडू, शंकरपाळ्या इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. याशिवाय काही लोक कामाच्या धावपळीमुळे फराळातील पदार्थ बाहेरून विकत आणतात. पण विकतच्या पदार्थांमध्ये सोड्याचा वापर केला जातो. सोडा खाल्यामुळे पोट सहज भरते आणि सारखी तहान लागते. त्यामुळे फराळातील कोणतेही पदार्थ बनवताना सोड्याचा अजिबात वापर करू नये. आज आम्ही तुम्हाला सोड्याचा वापर न करता कुरकुरीत आलू भुजिया शेव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बऱ्याचदा बाजारातून विकत आणलेली शेव जितक्या आवडीने खाल्ली जाते, तितक्याच आवडीने घरी बनवलेली शेव खाल्ली जात नाही. शेव बनवताना प्रमाणात गोंधळ झाल्यानंतर संपूर्ण पदार्थाची चव बिघडून जाते.त्यामुळे फराळातील कोणताही पदार्थ बनवताना अचूक प्रमाण घेऊन पदार्थ बनवावेत. चला तर जाणून घेऊया आलू भुजिया शेव बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)