फोटो सौजन्य - Social Media
आपण मुन्ना भाई MBBS हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटात मुन्ना म्हणजेच संजय दत्त इस्पितळात ज्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तींना मिठी देत सुटत असतो आणि त्या चित्रपट्यात असे दाखवले गेले आहे की जादू की झप्पी मिळताच लोकांचा ताण आणि दुखं तसेच दुखणं सारं काही अगदी क्षणार्धात मिटून जाते. गायब होऊन जाते. खरंच असं असतं का? Hug केल्याने आजारपण कमी होते का? मानसिक त्रास कमी होतो का? चला तर मग जाणून घेऊयात.
Hug Therapy नावाची थेरपी मुळात एकट्या आणि मानसिक तणावात असणाऱ्या लोकांसाठी वापरली जाते. याने व्यक्तीला भावनिक आधार तर मिळतोच तसेच मानसिक ताण बऱ्यापैकी कमी करण्यात मदत होते. Hug केल्याने शरीरातील लव हॉर्मोन जागे होतात आणि तणाव मोठ्या प्रमाणात कमी होतो. हृदयविकाराच्या काही समस्या असतील तर त्याही बऱ्यापैकी कमी होतात. हृदयाची धडधड अगदी संतुलित राहते. मिठी मारल्याने टेंशन हार्मोन कोर्टिसोल कमी होतात आणि डिप्रेशन किंवा इतर मानसिक त्रास होत असल्यास काही प्रमाणात आराम मिळतो.
एकंदरीत, मिठी हा एक भावनिक आधार आहे. एखादा व्यक्ती तुमच्या समोर रडत असेल तर सरळ त्याला मिठी मारा कारण त्याला त्यावेळी भावनिक आधाराची गरज असते. जेव्हा तुम्ही त्याला मिठी माराल तेव्हा त्याला भावनिक आधार तर मिळेलच तसेच तुम्ही त्याच्या थोड्या वेळापुरती का होईना, त्याला तणावमुक्त करण्यासाठी मोठे योगदान कराल आणि तो व्यक्ती अगदी मनापासून तुमचा भारी राहील. लहान मुलांना त्यांच्या आई वडिलांकडून मिळालेली मिठी फार महत्वाची असते. याने त्या मुलांमध्ये आत्मविश्वास, सुरक्षिततेची भावना आणि आधार असल्याची भावना मिळते.
एकंदरीत, मिठी त्या व्यक्तीला आजारपणाच्या विचारांतून आलेल्या तणावापासून काही काळ मुक्ती देईल पण आजार घालवण्यासाठी उपचाराची गरज असते. त्यामुळे आजार कोणताही असला तर सरळ डॉक्टरकडे जा.