Periods दरम्यान पेनकिलरची गोळी घेतल्यास प्रजननक्षमतेवर परिणाम होतो का? जाणून घ्या औषध घेताना कोणती काळजी घ्यावी
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये ओटीपोटात वेदना का होतात?
पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर घ्यावी का?
पेनकिलकर खाल्ल्यास प्रजननक्षमतेवर परिणाम होतो का?
सर्वच महिलांना महिन्यातील ५ किंवा ६ दिवस मासिक पाळी येते. पाळी येणे शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात महिलांना खूप जास्त त्रास होतो. पाळी येण्याच्या आठवडाभर आधी आणि पाळी आल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य काही काळापुरते असंतुलित होऊन जाते. पोटात दुखणे, कंबर दुखणे, उलट्या, मळमळ तर ओटीपोटात वेदना वाढल्यामुळे महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. काहीवेळा पाळीच्या वेदना एवढ्या तीव्र होतात की दैनंदिन जीवनातील कामे करण्याची अजिबात इच्छा होत नाही. पोटात किंवा ओटीपोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी महिला मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करतात. यामुळे तात्पुरता आराम मिळतो आणि पुन्हा एकदा पोटात वेदना वाढतात.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळी आल्यानंतर ओटीपोटात खूप जास्त वेदना होतात. या वेदना कमी करण्यासाठी पेनकिलरच्या गोळ्या खाल्ला जातात. गोळी खाल्ल्यानंतर तात्काळ वेदनांपासून आराम मिळतो पण याचे किडनी आणि शरीरातील इतर अवयवांवर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे चुकीच्या गोळ्यांचे अजिबात सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीत खाल्लेल्या पेनिकलरच्या गोळ्यांचा परिणाम प्रजननक्षमतेवर होतो का? यामुळे शरीराला कोणती हानी पोहचते? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.
मासिक पाळी दरम्यान गर्भाशय आकुंचन पावते. प्रत्येक महिन्याला गर्भधारणेची तयारी म्हणून गर्भाशयाच्या आतील भागात एक आवरण तयार होत असते, पण गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातून बाहेर टाकण्यासाठी गर्भाशय आकुंचन पावते. या संपूर्ण प्रक्रियेला चालना देण्यासाठी शरीरात ‘प्रोस्टाग्लँडिन्स’ नावाचे रसायन तयार होते. मासिक पाळी येण्याच्या आधी या रसायनामध्ये वाढ होते आणि पाळी आल्यानंतर खूप जास्त वेदना होतात. पोटात दुखणे, कंबर दुखणे, अंग दुखणे इत्यादी समस्या उद्भवून आरोग्य बिघडून जाते. तसेच गर्भाशय आकुंचन पावल्यामुळे काही काळासाठी ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो तर काही वेळा थांबण्याची शक्यता असते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पोटात वेदना वाढू लागतात.
मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्यानंतर गर्भाशयावर कोणताही परिणाम होत नाही. हा एक गैरसमज आहे. या गोळ्या काही काळ वेदनांपासून आराम मिळवून देतात आणि सूज कमी करण्यास मदत करतात. पेनकिलरच्या गोळ्या घेताना कधीही उपाशी पोटी घेऊ नये. याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्यांचे सेवन करावे.
Ans: डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य प्रमाणात घेतलेल्या पेनकिलरमुळे सहसा प्रजननक्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम होत नाही. मात्र वारंवार किंवा चुकीच्या पद्धतीने औषध घेणे टाळावे.
Ans: काही औषधे मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी वापरली जातात, पण योग्य औषध आणि डोससाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
Ans: सतत तीव्र वेदना होत असल्यास स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, कारण काही वेळा इतर आरोग्य समस्या कारणीभूत असू शकतात.






