चमकदार दातांसाठी स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर
सुंदर दिसण्यासाठी महिला जशी त्वचेची काळजी घेतात तशीच काळजी दातांची सुद्धा घेतली पाहिजे. सुंदर आणि स्मित हास्यासाठी दात स्वच्छ असणे आवश्यक आहे. आपले दात कायमच स्वच्छ, सुंदर आणि पांढरेशुभ्र असावेत, असे प्रत्येकालच कायमच वाटते. पण बऱ्याचदा आहारात होणाऱ्या बदलांमुळे दातांवर पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचा थर साचून राहतो. दातांवर साचून राहिलेले पिवळा आणि पांढरा थर दातांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून टाकतो. तसेच सतत गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे दातांना कीड लागणे, हिरड्यांमधून रक्त येणे, हिरड्यांना सूज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले जातात. दात स्वच्छ न ठेवल्यामुळे तोंडातून दुर्गंधीचा वास येऊ लागतो. यामुळे हसताना किंवा बोलताना लाजिरवण्यासारखे वाटू लागते.(फोटो सौजन्य – istock)
पहाटेच्या वेळी अनेकांना हृदयविकाराचा झटका का येतात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण
काहींना नियमित तंबाखू, गुटखा किंवा पान खाण्याची सवय असते. सतत पान किंवा तंबाखू खाल्यामुळे दात अस्वच्छ होऊन जातात. दातांवर लाल रंगाचा घाणेरडा किळसवाणा थर तसाच साचून राहतो. ज्यामुळे काहीवेळा दातांमधून रक्त येण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दातांवर साचून राहिलेला पिवळा आणि पांढरा थर काढून टाकण्यासाठी कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या वापरामुळे दात मोत्यासारखे चमकदार होतील.
दातांवर वाढलेला पिवळा आणि पांढरा थर कमी करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. यामध्ये असलेले नैसर्गिक एक्सफोलिएटर दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करतात. यासाठी बेकिंग सोड्याची जाडसर पेस्ट तयार करून त्यात थोडीशी कोलगेट टाकून दातांवर घासल्यास दात पांढरे होण्यास मदत होईल. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्यास काही दिवसांमध्ये फरक दिसून येईल.
निरोगी आरोग्यासाठी केळी खाणे अतिशय फायदेशीर आहे. नियमित २ केळी खाल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. केळी खाल्ल्यानंतर केळीची साल फेकून दिली जाते. पण याच सालीचा वापर करून तुम्ही दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करू शकता. यासाठी केळीची साल घेऊन दातांवर चोळा आणि त्यानंतर दात स्वच्छ करा. पाण्याच्या गुळण्या करून दात स्वच्छ केल्यास हिरड्यांमध्ये अडकलेली घाण स्वच्छ होईल.
संत्र्याच्या सालीमध्ये असलेले गुणधर्म दातांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. यामध्ये असलेले सिट्रिक अॅसिड दातांवरील पिवळसर थर कमी करण्यासाठी मदत करते. दातांवर संत्र्याची साल हलक्या हाताने चोळून घ्यावी. त्यानतंर पाण्याचे दात स्वच्छ करून घ्यावे. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास दातांवर वाढलेला पिवळा थर कमी होईल आणि दात स्वच्छ दिसतील.
दात पिवळे होण्याची कारणे?
कॉफी, चहा, रेड वाईन आणि बेरीजसारखे काही पदार्थ आणि पेये दातांना डाग देऊ शकतात. दातांचा रंग खराब होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे धूम्रपान.
पिवळ्या दातांसाठी घरगुती उपाय:
स्ट्रॉबेरी आणि अननस सारखी काही फळे आणि भाज्या दात पांढरे करण्यास मदत करतात असे मानले जाते. दूध आणि दही सारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेट असतात जे दातांच्या मुलामा चढवणे मजबूत करू शकतात.
पिवळ्या दातांसाठी व्यावसायिक उपचार:
व्हेनियर्स हे पातळ कवच असतात जे दातांच्या पुढच्या पृष्ठभागावर झाकतात आणि त्यांचा वापर दातांचा रंग सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो.