वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वयाच्या ३० व्या वर्षानंतर हाडांमध्ये वेदना, कंबर दुखणे, अशक्तपणा, मासिक पाळीच्या वेदना, मानसिक तणाव इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. यामुळे शारीरिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. हाडांची झीज होण्यास सुरुवात झाल्यानंतर ऑस्टियोपोरोसिस, सांधेदुखी आणि अशक्तपणा इत्यादी समस्या वाढतात. हाडे कायमच मजबूत आणि लवचिक ठेवण्यासाठी आहारात केवळ कॅल्शियमच नाही तर विटामिन डी, मॅग्नेशियम, प्रथिने आणि फॉस्फरस असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे वाढत्या वयात सुद्धा तुमची हाडे कायमच मजबूत राहतील. (फोटो सौजन्य – istock)
हाडे मजबूत ठेवण्यासाठी वयाच्या ३० व्या वर्षानंतर आहारात करा 'या' सुपरहेल्दी पदार्थांचा समावेश

दूध, दही आणि चीजमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आढळून येतात. हे पदार्थ हाडांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. दररोज एक ग्लास दूध किंवा दही हाडे दीर्घकाळ मजबूत राहतात.

सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन अंडी खावी. अंडी खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते आणि हाडांना सुद्धा अनेक फायदे होतात.

पालक, मेथी, मोहरी आणि मुळा इत्यादी पालेभाज्यांचे रोजच्या आहारात नियमित सेवन करावे. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.

हिवाळ्यात तीळ खाणे हाडांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. जवसातील ओमेगा-३ फॅटी ऍसिड असतात.

Untitled design (10)






