सांध्यांमध्ये कायमच तीव्र वेदना होतात? हाडांचा टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे
हाडांचा टीबी कशामुळे होतो?
हाडांचा टीबी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
टीबी बरा होण्यास किती वेळ लागतो?
जीवनशैलीत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, चुकीच्या वेळी जेवण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये विविध आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातील अतिशय धोकादायक आजार म्हणजे टीबी. हा गंभीर आजार जागतिक स्तरावर धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे पहिल्या टप्प्यातील आजार शेवटच्या टप्प्यात पोहचतो, ज्याच्या परिणामामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
टीबी हा आजार प्रामुख्याने मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जिवाणूमुळे होतो. याचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होऊन, संपूर्ण फुफ्फुस निकामी होऊन जातात. टीबी हा आजार केवळ किडनी, डोळ्यांचं नाहीतर हाडांना सुद्धा होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. आज आम्ही तुम्हाला हाडांचा टीबी कशामुळे होतो? हाडांमध्ये टीबी झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हाडांचा टीबी ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूमुळे होतो. हा विषाणू प्रामुख्याने फुफ्फुसाव्यतिरिक्त शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरणारा आजार आहे. हाडांचा टीबी पाठीचा कणा, हात, मनगट, आणि कोपर इत्यादी सांध्यांवर गंभीर परिणाम करतो. एचआयव्ही/एड्स, मधुमेह किंवा कुपोषण किंवा खूप कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना सहज हाडांचा टीबी होऊ शकतो. टीबीचा गंभीर विषाणू रक्तप्रवाहातून किंवा लसीका प्रणालीद्वारे हाडांपर्यंत पोहचून हाडांचे नुकसान करून करतो. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य वाटणारी लक्षणे संपूर्ण शरीर आतून पोखरून काढतात.
हाडे आणि सांध्यांमध्ये वाढलेल्या तीव्र वेदना.
प्रभावित भागावर सूज येऊन सांधे कडक होणे.
संध्याकाळी किंवा रात्री हलका ताप येणे.
रात्रीच्या वेळी अचानक घाम सुटणे.
झपाट्याने वजन कमी होऊन थकवा अशक्तपणा वाढणे.
टीबी हा आजार बरा होण्यास सामान्यतः ६ ते १८ महिने लागतात. या कालावधीमध्ये संसर्गाची तीव्रता, बाधित हाडाचे स्थान आणि उपचारांना मिळणाऱ्या प्रतिसादावर आजार बरा होणे अवलंबून असते. औषधांचे सेवन करण्यास सुरुवात केल्यानंतर ४ ते ५ आठवड्यानंतर शरीरातील वेदना कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते. पण बरे वाटल्यानंतर मधेच औषधांचे सेवन करणे बंद केल्यास पुन्हा एकदा टीबीची लागण होऊ शकते. तसेच गंभीर प्रकरणांमध्ये मणक्यात टीबी झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.
Ans: हाडांमध्ये किंवा सांध्यांमध्ये Mycobacterium tuberculosis या जीवाणूमुळे होणारा संसर्ग म्हणजे हाडांचा टीबी. हा टीबीचा एक प्रकार असून तो हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो.
Ans: शरीरातील इतर भागातून (विशेषतः फुफ्फुसांमधून) टीबीचा संसर्ग रक्त किंवा लसीका मार्गाने हाडांपर्यंत पोहोचल्यास हाडांचा टीबी होऊ शकतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असणे हा देखील एक धोका वाढवणारा घटक असू शकतो.
Ans: होय, योग्य वेळी निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार करून हाडांचा टीबी नियंत्रित आणि बरा केला जाऊ शकतो.






