पोटावर वाढलेली थुलथुलीत चरबी डाएट करून सुद्धा कमी होत नाही? मग 'या' पद्धतीने करा ताकाचे सेवन
जगभरात लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जातात. पण आहारात होणाऱ्या चुकांमुळे आणि जीवनशैलीतील बदलांमुळे वाढलेले वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जाते. शरीरावर वाढलेल्या अनावश्यक चरबीमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. काहीवेळा चारचौघांमध्ये गेल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. त्यामुळे वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी महिला तासनतास जिम करणे, डाएटमध्ये बदल, अधिक वेळ उपाशी राहणे इत्यादी अनेक गोष्टी फॉलो करतात. पण तरीसुद्धा वजनावर नियंत्रण मिळवता येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ताकाचे सेवन कशा पद्धतीने करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये ताक, दही किंवा इतर थंड पदार्थांचे सेवन केले जाते. ताक प्यायल्यामुळे शरीरात थंडावा कायम टिकून राहतो. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी ताक प्यावे. याशिवाय वाटीभर दही खाल्यास शरीर कायमच निरोगी राहील. ताक प्यायल्यामुळे ऍसिडिटी कमी होते, शरीर हायड्रेट राहते आणि शरीराला थंडावा मिळतो. यामध्ये असलेले चांगले बॅक्टरीया मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत करतात. याशिवाय ताक प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. ताक प्यायल्यानंतर वजन झपाट्याने कमी होते.
काहींब जेवणाआधी ताक पिण्याची सवय असते. ताकाचे सेवन केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. जेवणात ताकाचे सेवन केल्यास शरीरातील अननपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. याशिवाय जेवणाआधी ताक प्यायल्यास पोट भरल्यासारखे वाटते. ताकामध्ये कमी कॅलरीज आणि उच्च पोषक तत्व आढळून येतात. 100 मिलीलीटर ताकामध्ये ४० ते ४५ कॅलरीज असतात. त्यामुळे उच्च कॅलरीज मिळवण्यासाठी ताक पिणे उत्तम पर्याय आहे. ताकामध्ये प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते. आतड्यांच्या आरोग्यासाठी दुपारच्या जेवणात नियमित ताक प्यावे. चयापचय सुधारल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी करताना आहारात कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी ताकाचे सेवन करावे.
कोणत्याही वेळी ताकाचे सेवन करू नये. दुपारच्या आहारात प्रामुख्याने ताकाचे सेवन केले जाते. वजन कमी करताना जेवणाआधी एक ग्लास ताक प्यायल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहील आणि जेवणात कमी अन्नपदार्थांचे सेवन होईल. दुपारी जेवल्यानंतर ताकाचे सेवन केल्यास पचनक्रिया कायमच निरोगी राहील. यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात. घरी जर तुम्ही ताक बनवत असाल तर ते पातळ असावे. ताकात जास्त मीठ घालू नये. काहींना मसाला ताक प्यायला खूप जास्त आवडते. पण वजन कमी करताना मसाल्याच्या ताकाचे अजिबात सेवन करू नये.
पाण्याच्या मदतीने सहज फुटेल नारळ, जोर लावायचीही गरज नाही; फक्त ही ट्रिक फॉलो करा
वजन कमी करण्यासाठी आहारविषयक टिप्स:
आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने यांचा समावेश करा. साखरयुक्त पेये, फॅटी पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ जास्त खाणे टाळा. दररोज पुरेसे पाणी प्या, ज्यामुळे चयापचय (metabolism) वाढतो आणि कॅलरीज बर्न होतात.
लठ्ठपणा म्हणजे काय?
लठ्ठपणा ही एक गंभीर आरोग्य स्थिती आहे, ज्यात शरीरात गरजेपेक्षा जास्त चरबी जमा होते. यामुळे अनेक जुनाट आजारांचा धोका वाढतो.
लठ्ठपणाचे धोके आणि दुष्परिणाम?
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार.कर्करोगाचा वाढलेला धोका.बालपणातील लठ्ठपणा: यामुळे मानसिक आरोग्य समस्या (उदा. कमी आत्मविश्वास, नैराश्य) आणि सामाजिक अडचणी येऊ शकतात.