फोटो सौजन्य- pinterest
जगातील सर्वांत शांत आणि साधा माणूस, जो सतत कष्ट करत राहतो पण कधीही स्वतःला होणाऱ्या त्रासाबद्दल कुठेही न बोलणारा नेहमीच चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवणारा माणूस म्हणजे बाबा होय. आपल्या जीवनामध्ये असा एक तरी माणूस असतो जो कायम आपल्यासाठी झटत असतो, कधीही मी थकलोय किंवा मला त्रास होतोय अशी कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाही. तो व्यक्ती कधी हसून, शांत राहून तर कठोर मेहनत घेऊन आपल्याला योग्य दिशा दाखवतात, तो व्यक्ती म्हणजे बाबा होय.
त्याचप्रमाणे सर्व दिवस पालकांप्रती प्रेम, समर्पण, त्याग, आदर आणि सन्मान दाखवण्यासाठी असतात. मात्र, काही विशेष दिवस साजरे केले जातात पण असे काही दिवस असतात जे पालकांना खास वाटावे म्हणून साजरे केले जातात. यामधीलच एक दिवस म्हणजे फादर्स डे. हा दिवस यंदा सर्वत्र रविवार, 15 जून रोजी साजरा केला जाणार आहे. जाणून घ्या फादर्स डे ची सुरुवात कशी झाली आणि त्याचा इतिहास
फादर्स डेची सुरुवात मुलीच्या प्रेमापोटी आणि आदराने झाली, अशी मान्यता आहे. सोनेरा स्मार्ट डोड नावाच्या महिलेने 1910 मध्ये तिच्या वडिलांच्या सन्मानार्थ पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. सोनेराचे वडील विल्यम जॅक्सन स्मार्ट हे एकटे पालक होते ज्यांनी त्यांच्या सहा मुलांना एकट्याने वाढवले होते. सोनेरा यांच्या मनात अशी कल्पना आली की, जसा आईसाठी समर्पित मातृदिन हा खास दिवस आहे तसाच वडिलांसाठी एक खास दिवस असावा. यामुळे वॉशिंग्टनमध्ये जून 1910 मध्ये पहिल्यांदाच फादर्स डे साजरा करण्यात आला. दरम्यान, 1972 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी अधिकृतपणे घोषित केले की जून महिन्यातील तिसरा रविवार फादर्स डे म्हणून साजरा करण्यात येईल. त्यावेळेपासून जगभरात जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.
त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा गेल्या दोन शतकांपासून फादर्स डे साजरा करण्यामागचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. यावेळी मुलं आपल्या वडिलांना एखादी वस्तू भेट म्हणून देतात तर काहींजण बाहेर फिरायला घेऊन जातात. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो.
अमेरिकेमधील वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील फेअरमॉट या शहरामध्ये एका खाण दुर्घटनेनंतर फादर्स डेची सुरुवात झाली. या अपघातांमध्ये 362 लोकांचा मृत्यू झाला होता त्यांना श्रद्धांजली म्हणून यावेळी पहिल्यांदा फादर्स डे साजरा करण्यात आला. यानंतर सोनेरा स्मार्ट डोड या महिलेला फादर्स डे साजरा करण्याची कल्पना सुचली. तिच्या आईच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी 6 मुलांचे पालनपोषण केले होते. त्यामुळे तिला असे वाटले की जसे आईसाठी म्हणून आपण मातृदिन साजरा करतो तसाच वडिलांच्या प्रेमापोटी, कष्टासाठी, त्यागासाठी एक खास दिवस असावा.
त्यांनी ही कल्पना 1909 मध्ये स्थानिक चर्च, दुकानदार, इतर संस्था तसेच काही सरकारी लोकांनी याला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे पहिला फादर्स डे तिथे साजरा करण्यात आला. ही चर्चा हळूहळू वाऱ्यासारखी अमेरिका आणि संपूर्ण जगभर पसरली. त्यानंतर जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी संपूर्ण जगभर फादर्स डे साजरा केला जातो.