सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची देशभरात HPV-कर्करोग जनजागृती मोहीम सुरू
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) च्या नेतृत्वाखालील देशव्यापी सार्वजनिक आरोग्य उपक्रमाचा भाग म्हणून आज पुण्यात “कॉन्क्युअर एचपीव्ही अँड कर्करोग कॉन्क्लेव्ह 2025 ” लाँच करण्यात आले.भारताला अजूनही HPV-संबंधित आजारांचा, विशेषतः गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे, जो देशातील महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग झाला आहे. HPV आणि कर्करोगावरील ICO/IARC माहिती केंद्र (2013 ) नुसार, भारतात दरवर्षी 1.23 लाखांहून अधिक नवीन गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे रुग्ण आणि 77,000 हून अधिक जणांचा संबंधित रोगाने मृत्यू झाल्याची नोंद केली जात आहे. याशिवाय ९०% पर्यंत गुदद्वाराशी संबंधित कर्करोग आणि 63 % पर्यंत पेनिल कॅन्सर HPV शी संबंधित आहेत.
पोटावर लटकलेली चरबी कमी करण्यासाठी गुणकारी ठरेल हे आयुर्वेदिक चूर्ण, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये, वैद्यकीय तज्ञांच्या एका पॅनेलने एचपीव्हीचा सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत सखोल चर्चा केली. या पॅनेलमध्ये पुढील डॉक्टर समाविष्ट होते:
डॉ. मीनू अग्रवाल – सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ वंध्यत्व विशेषज्ञ आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, FOGSI २०२६ चे आगामी उपाध्यक्ष, सेकंडक्टर जनरल-इंटरनॅशनल सोसायटी ऑफ गायनेकोलॉजिकल एंडोस्कोप
डॉ. शिरीष कांकरिया – शिशुमोह क्लिनिक, इनामदार हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, पुणे येथे प्रॅक्टिसिंग बालरोगतज्ञ. कोषाध्यक्ष, IAP पुणे, 2024 , अध्यक्ष, IAP पुणे, 2024
डॉ. महिमा लालवानी – सल्लागार प्रसूतीतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, वंध्यत्व विशेषज्ञ आणि संचालक, लालवानी मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल, पुणे या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. संजय के. लालवानी – उपप्राचार्य, वैद्यकीय संचालक प्राध्यापक आणि प्रमुख-बालरोग विभाग, भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, पुणे यांनी केले. आयएपी-आयसीपी गव्हर्निंग कौन्सिल सदस्य 2024-26 . डॉ. संजय लालवानी यांनी तातडीने जागरूकता करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केलं तसेच किशोरवयीन मुले आणि पालक या दोघांपर्यंत पोहोचण्याचे महत्त्व आणि त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आरोग्य सेवा प्रदात्यांची असलेली महत्त्वाची भूमिका यावर प्रकाश टाकला आहे.
वक्त्यांनी यावर भर दिला की HPV हा केवळ गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग पुरता मर्यादित नाही. हे व्हल्व्हर, योनी, गुदद्वारा, पेनिल, ऑरोफॅरिंजियलच्या कर्करोगाशी देखील संबंधित आहे, जे पुरुष आणि महिला दोघांनाही प्रभावित करते. 15 ते 25 वयोगटामधील मुल-मुलींमध्ये HPV संसर्गाची शक्यता सर्वाधिक असल्याने, लवकरात लवकर याविषयी जागरूकता आणि त्यावर वेळेवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. आता उपलब्ध असलेल्या आणि परवडणाऱ्या HPV लसीमुळे, HPV शी संबंधित कर्करोगांपासून प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण करणे आणखी सोपे झाले आहे.
“देशभरात आयोजित केलेल्या या कॉन्क्लेव्हद्वारे, आम्ही ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) आणि त्याचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी व इतर कर्करोगांशी असलेला संबंध याबद्दलची समाजामध्ये असलेली समज आणखी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवतो,” असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक पराग देशमुख म्हणाले. वैद्यकीय तज्ञ, आरोग्यसेवा कर्मचारी आणि समाजातील सदस्यांना एकत्रित आणून, हे व्यासपीठ रोग्याचे निदान आणि त्यावर प्रतिबंध चर्चा करण्यासाठीच्या धोरणांना प्रोत्साहन देते.”
पुणे कॉन्क्लेव्हचा समारोप प्रेक्षकांच्या खुल्या संवादाने झाला, ज्यामुळे मोहिमेच्या व्यापक उद्दिष्ट आणखी बळकट झाली: माहितीपूर्ण निर्णय घेण्याद्वारे आणि समाजातील सहभागाद्वारे प्रतिबंधित कर्करोगाचे ओझे कमी करणे. येत्या काही महिन्यांत देशभरातील शहरांमध्ये हा उपक्रम सुरू राहील, ज्यामुळे आरोग्यसेवेतील विश्वासार्ह आवाजांना शिक्षित करण्यासाठी व्यासपीठ तयार करणे हे उद्दिष्ट आहे.
पुण्यात मुख्यालय असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे आणि तिने भारतात आणि जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्याच्या प्रगतीमध्ये दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गेल्या ५ दशकांहून अधिक काळ परवडणाऱ्या आणि उच्च दर्जाच्या लसी पुरवण्यात आघाडीवर आहे. जागतिक लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या ध्येयाने, सीरम इन्स्टिट्यूटने भारतातील पहिली स्वदेशी विकसित लिंग-तटस्थ क्वाड्रिव्हॅलेंट HPV लस, सर्व्हाव्हॅक लाँच करून सार्वजनिक आरोग्यात एक महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे जी पुरुष आणि महिला दोघांनाही दिली जाऊ शकते.
सायरस पूनावाला यांच्या ग्रुपचा भाग असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी लस उत्पादनात जागतिक आघाडीवर आहे, जी जगभरात अत्यंत कमी कमिंतीमध्ये लस पुरवण्यासाठी ओळखली जाते. अमेरिका, यूके आणि युरोपसह १७०+ देशांमध्ये कार्यरत असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( SII) ही जागतिक स्तरावर उत्पादित संख्येनुसार जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. SIIPL’s चे मल्टीफंक्शनल उत्पादन हे पुण्यातील हडपसर व मांजरी येथील सर्वात मोठ्या सुविधांपैकी एक, ज्याची वार्षिक क्षमता 4 अब्ज डोस आहे, गेल्या काही वर्षांत 3 कोटींहून अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत.
1966 मध्ये स्थापन झालेल्या एसआयआयपीएलचे प्राथमिक ध्येय म्हणजे परवडणारी क्षमता आणि उपलब्धतेवर विशेष भर देऊन जीवनरक्षक इम्युनोबायोलॉजिकल औषधे तयार करणे हे आहे. जागतिक आरोग्य सुधारण्याच्या दृढ वचनबद्धतेमुळे, कंपनीने घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, एचआयबी, बीसीजी, आर-हिपॅटायटीस बी, गोवर, गालगुंड आणि रुबेला यांसारख्या आवश्यक लसींच्या किमती कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उल्लेखनीय म्हणजे, ते जगातील सर्वात परवडणारी पीसीव्ही ‘न्यूमोसिल’, भारतातील पहिली स्वदेशी qHPV लस ‘Cervavac’ आणि मलेरियाचे प्रमाण जिथे लहान मुलांमध्ये जास्त आहे तिथे वापरण्यासाठी अधिकृत केलेली दुसरी मलेरिया लस R21/Matrix-M™️, जगातील पहिली पेंटाव्हॅलेंट (ACYWX) मेनिन्गोकोकल पॉलिसेकेराइड कॉन्जुगेट लस ‘मेनफाइव्ह’ चे उत्पादक आहेत, ज्याला लहान मुलांसाठी वापरण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे आणि WHO ने पूर्व-पात्रता दिली आहे. शिवाय, SIIPL ही कोविड-19 विरुद्धच्या जागतिक लढाईत आघाडीवर आहे, जगभरात कोविड-19 लसीचे २ अब्जाहून अधिक डोस केले पुरवत आहेत.
जागतिक स्तरावर आपली पोहोच वाढवण्यासाठी आणि लसीची उपलब्धता वाढवण्यासाठी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने यूकेमध्ये सीरम लाईफ सायन्सेस लिमिटेड आणि अमेरिकेत सीरम इंक.(Serum Inc) ची स्थापना केली. नवीन उपक्रम हाती घेऊन सीरम जगभरातील लाखो लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करून, परवडणाऱ्या लसींच्या कारणाचे समर्थन करत राहते.