दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कोबीची कोशिंबीर
दुपारच्या जेवणात नेहमी नेहमी काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. डाळ, भात, भाजी, चपातीसोबतच तोंडी लावण्यासाठी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना कोबीची भाजी खायला आवडत नाही. कोबीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. तर काही लोक कोबीला येणाऱ्या उर्ग वासामुळे कोबीची भाजी बनवण्यास नकार दिला जातो. पण कोबीची भाजी आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. आज आम्ही तुम्हाला कोबीची भाजी न बनवता कोबीची भाजीपासून कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही कोशिंबीर सॅलडपेक्षाही चवीला अतिशय सुंदर लागते.जेवणात तोंडी लावण्यासाठी कोबीची कोशिंबीर असेल तर जेवणात चार घास जास्त जातील. चला तर जाणून घेऊया कोबीची कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)