अंघोळीनंतर त्वचेला लावा 'हे' प्रभावी पदार्थ
वातावरणात गारवा वाढल्यानंतर त्वचा कोरडी होऊन जाते. त्वचा कोरडी झाल्यानंतर हळूहळू त्वचेची साल निघणे, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचेवरील चमक कमी झाल्यानंतर महिला सतत काहींना काही उपाय करतात. पण असे कारण्यावेजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचा ताणली जाते. त्वचा ताणल्यामुळे त्वचेमधील चमक निघून जाते आणि चेहरा कोरडा आणि रुक्ष दिसू लागतो. चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम्स किंवा इतर कोणत्याही स्किन उजळवणाऱ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण यामुळे काहीकाळ त्वचा सुंदर दिसते पण कालांतराने त्वचा पुन्हा एकदा कोरडी होऊन जाते.(फोटो सौजन्य-istock)
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महिला अनेक उपाय करतात, मात्र केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करण्यास जास्त प्राधान्य द्यावे. त्वचेवर नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. तसेच त्वचेला बाहेरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे फगर गरजेचे आहे. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात त्वचेवर नैसर्गिक ग्लो टिकून राहण्यासाठी अंघोळ केल्यानंतर त्वचेला क्यू लावावे, जाणून घेऊया.
हे देखील वाचा: तांदळाच्या पाण्याचा कसा कराल केसांसाठी वापर
नैसर्गिक गुणधर्म असलेले खोबरेल तेल अनेक आजारांवर गुणकारी आहे. खोबरेल तेलात असलेले गुणधर्म त्वचा मऊ आणि नितळ ठेवण्यास मदत करतात. शिवाय खोबरेल तेलाचा वापर खाद्यपदार्थ बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. अंघोळ केल्यानंतर दोन थेंब खोबरेल तेल घेऊन चेहऱ्यावर मालिश केल्यास त्वचा चमकदार आणि मऊ होते. या तेलामुळे त्वचेवर चमक येते. शिवाय खोबऱ्याच्या तेलात दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.
लिंबू आणि मधामध्ये असलेले विटामिन सी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. वाटीमध्ये अर्ध चमचा लिंबाचा रस घेऊन त्यात मध मिक्स करून त्वचेवर लावा. यामुळे त्वचा उजळदार होण्यास मदत होईल. त्वचेचा रंग सुधारण्यासाठी लिंबाचा रस आणि मध अतिशय फायदेशीर आहे. तयार केलेली पेस्ट अंघोळीपूर्वी त्वचेला लावून ५ ते १० मिनिटांनी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा.
हे देखील वाचा: प्रेग्नेन्सीमध्ये कोणते योगासन करावे
मागील अनेक वर्षांपासून सुंदर त्वचा आणि केसांसाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. कोरफड जेल लावल्यानंतर त्वचा हायड्रेट राहते. तसेच त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी कोरफड जेल लावावे. यामध्ये अनेक जीवनसत्वे आणि गुणकारी घटक आढळून येतात. अंघोळ केल्यानंतर त्वचेवर कोरफड जेल लावून काहीवेळ मसाज करा, त्यानंतर पाण्याने स्वच्छ करा.