सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरत असतो. अनेकदा सकाळचा नाश्ता हा पौष्टिक करण्याचा सल्ला दिला जातो, याने आपले पोट भरलेले राहते आणि यातून दिवसभरासाठी आपल्याला एनर्जी मिळते. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण बाहेरचे पदार्थ खाण्यावर अधिक भर देतात मात्र यामुळे आपले आरोग्य धोक्यात पडू शकते. बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याऐवजी तुम्ही घरीच स्वादिष्ट आणि हेल्दी असे अनेक पदार्थ बनवू शकता.
हेल्दी म्हटलं की ओट्सचे नाव आलेच. मात्र ओट्सची चव फारशी चविष्ट नसल्याकारणाने अनेक लोक याला खाणे टाळतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? तुम्ही ओट्सपासून नवीन स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता, जो चवीलाही अप्रतिम असेल आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ओट्स कटलेट. ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे मात्र तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही ही रेसिपी बनवू शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – Poha Papad Recipe: जेवणाची चव वाढवेल पोह्यांचे कुरकुरीत पापड! लगेच रेसिपी नोट करा