पापड हा पदार्थ कोणाला आवडत नाही. कुरकुरीत पापड जेवणाची चव द्विगुणित करतो. घरी आपला आवडता पदार्थ बनवला नसला तरी फक्त पापडाने आपल्याला जेवणाची इच्छा होऊ लागते. वरण भातासोबत तर हा पापड अप्रतिम लागतो. पापड तळून किंवा भाजून खाल्ला जातो मात्र कोणत्याही प्रकारे याची चव छानच लागते. पापड अनेक प्रकारचे बनवले जातात जसे की, उडीद, मूग, नाचणी, ज्वारी, तांदूळ आणि इतरही. मात्र आज आम्ही तुम्हाला पोह्यांपासून कुरकुरीत पापड कसे तयार कारायचे याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.
पोह्यांपासून बनवण्यात आलेले हे पापड चवीला रुचकर आणि स्वादिष्ट लागतात. हे पापड तुम्ही एकदाच बनवून महिनोंमहिने साठवून ठेवू शकता. तसेच हे बनवण्यासाठी अधिक साहित्याची आवश्यकता भासत नाही. तुम्ही कमी सामानात उत्कृष्ट पापड बनवू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.