(फोटो सौजन्य – Pinterest)
ईदचा सण जवळ आला आहे. रमजान महिना संपत आला आहे. अशा परिस्थितीत आता लोकांची ईदची तयारी सुरू केली आहे. ईद म्हणजे आनंदाचा सण. हा सण मुस्लिम समाजाचा एक प्रमुख सण आहे. ईद हा केवळ उपासनेचा आणि आनंदाचा सण नसून स्वादिष्ट भोजनाचाही सण आहे. या दिवशी घराघरांत चवदार पदार्थांची मेजवानी तयार केली जाते. ईदच्या मेजवानीत प्रामुख्याने तयार होणारा पदार्थ म्हणजे कबाब. हे कबाब चवीला इतके कमाल लागतात की जगभर यांची ख्याती पसरलेली आहे. कबाब हे अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाऊ शकतात. अशात आज आम्ही तुमच्यासोबत काही खास कबाब्सची रेसिपी शेअर करत आहोत. या रेसिपी तुमची इफ्तार पार्टी आणखीन मजेदार आणि टेस्टी बनवतील.
गलोटी कबाब
गलोटी कबाब लखनौची शान मानली जाते. हे कबाब इयके मऊ असतात की ते तोंडात जाताच विरघळतात. हे कबाब मसाले आणि ग्राउंड मटण किंवा चिकनसह तयार केले जातात. यंदाच्या इफ्तार पार्टीसाठी तुम्ही हे कबाब नक्कीच ट्राय करू शकता. हिरवी चटणी आणि पराठ्यासह हे कबाब खाण्यासाठी सर्व्ह केले जातात.
शमी कबाब
शमी कबाब ईदला बनणारी एक खास डिश आहे. हॉटेलमध्ये तुम्ही अनेकदा हा पदार्थ पाहिला असेल. हे चविष्ट कबाब चिकन किंवा मटण, चना डाळ आणि मसाल्यापासून तयार केला जातात. ते कुरकुरीत होईपर्यंत तव्यावर बेक केले जाते, ज्यामुळे त्याची चव आणखीनच स्वादिष्ट बनते. शमी कबाब कोथिंबीर-पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो. चटणीसह याची चव आणखीनच दुप्पट होते.
हरा भरा कबाब
जर तुम्ही ईदच्या दिवशी शाकाहारी पर्याय शोधत असाल तर हरा भरा कबाब हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हे पालक, बटाटे, हिरवे वाटाणे आणि चीज मिसळून बनवले जाते. हे केवळ आरोग्यदायीच नाही तर अतिशय आकर्षकही दिसते. तुम्ही हिरव्या चटणीसोबत पाहुण्यांना ते सर्व्ह करू शकता. याची चव घरातील सर्वांना खुश करेल.
दही कबाब्स
ईदच्या दिवशी हलके आणि चविष्ट काहीतरी करून पहायचे असेल तर दही कबाब तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. हे हँग दही, ब्रेड क्रंब आणि मसाल्यापासून तयार केले जाते. हा कबाब बाहेरून कुरकुरीत आणि आतून क्रीमी असतात, याची अनोखी चव घरातील सर्वांनाच खुश करेल. गरमागरम हिरव्या चटणीसोबत ते खायला फार चवदार लागतात.