बदलत्या हवामानानुसार सर्दी, खोकल्याचा त्रास फार नॉर्मल आहे. आता पावसाळा जवळ येऊन ठेपलाय, पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप असे अनेक समस्या उद्भवत असतात. पावसाळ्यात गरम तर कमी होते मात्र आजारांची साथ वाढते. प्रत्येक वेळी तुम्ही डॉक्टरांकडे गेलेच पाहिजे असे नाही, सर्दी, खोकल्यासारख्या समस्यांना तुम्ही घरीही अगदी सहज आणि सोप्या उपायांनीं दूर करू शकता.
आज आपण याच घरगुती उपायांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहीतीच असेल मध, हळद आणि आले आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या वातावरणात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात या गोष्टींचा जास्तीत जास्त समावेश करून घ्या.
सर्दी, खोकला दूर करण्यासाठीचे घरगुती उपाय
[read_also content=”चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी करा दालचिनीचा वापर, तज्ज्ञ काय सांगतात, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/lifestyle/use-cinnamon-to-get-rid-of-pimples-on-the-face-read-experts-advise-542461.html”]
सूप
पावसाळ्याच्या थंड वातावरणात गरमा गरम सूपचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. सर्दी, खोकला, टॅप अशा समस्या दूर करण्यासाठी आहारात सूपचा समावेश करा. शक्यतो सूपमध्ये जास्तीत जास्त भाज्या टाकण्याचा प्रयत्न करा. सूपमध्ये अनेक पोषकतत्वे आढळली जातात, ज्यामुळे शरीरासाठी याचा बरच फायदा होतो. तुम्ही अनेक वेगवगेळ्या गोष्टींचा सूप बनवून पिऊ शकता जसे की, टोमॅटो सूप, चिकन सूप, भांज्याचे सूप. लक्षात ठेवा, सूप कोणताही असो मात्र त्यात आठवणीने आल्याचा वापर करा.
हळदीचे दूध
अनेकदा आईकडून हळदीचे दूध पिण्याचा आग्रह केला जातो. सर्दी, खोकला दूर करण्यासाठी हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. कोरड्या खोकल्यावर उपाय म्हणून हळद एक उत्तम पर्याय आहे. पावसाळ्याच्या दिवसांत,रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास दुधात, १ चमचे हळद टाकून मिक्स करा आणि रोज याचे सेवन करा. याने सर्दी, खोकला तर दूर होईलच मात्र त्यामुळॆ तुम्हाला शांत झोपही येईल.
काळी मिरीचा चहा
स्वयंपाकघरात वापरली जणारी काळीमिरी आरोग्यसाठी फार फायदेशीर असते. काळीमिरीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे संसर्गासून संरक्षण करण्यास मदत करतात. यातील पोषक घटक अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. यासाठी एक कप चहामध्ये काळी मिरी आणि चिमूटभर मीठ टाकून चांगले गरम करून, उकळवून घ्या आणि मग याचे सेवन करा. तुम्ही एखादी काळी मिरी चघळूनदेखील खाऊ शकता. पावसाळ्यात चहा पिण्याचे प्रमाण अधिक असते, अशा वेळी तुम्ही आपल्या चहात काळी मिरी टाकून याचे सेवन करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.