जर तुम्ही वजन वाढण्याच्या भीतीने तूप खात नसाल आणि तुम्हाला तूप खाणे चुकीचे वाटत असेल तर तुम्ही चुकीच्या डाएटवर आहात. ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटामिन ए सारखे अनेक पोषक घटक तुपात आढळतात जे आपल्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
विश्वास बसत नसेल तर तुम्ही बॉलिवूड अभिनेत्रींच्या मुलाखती पाहू शकता. शिल्पा शेट्टी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर, क्रिती सेनन आणि रकुल प्रीत सिंग यांसारख्या फिट अभिनेत्रीही रोज तूप खातात. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमुळे तूप खाण्याचा ट्रेंड पुन्हा एकदा आला आहे. या अभिनेत्रींपासून प्रेरित होऊन तुम्हीही रोजच्या आहारात तुपाचा समावेश करू इच्छित असाल, पण योग्य वेळ आणि प्रमाण याबाबत संभ्रमात असाल तर सेलिब्रिटी ऋजुता दिवेकरने काही सोप्या टिप्स दिल्या आहेत. तुम्ही कधी, कोणत्या वेळी आणि किती तूप खावे हे आपण या लेखातून जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
कधी आणि किती खावे तूप?
ऋजुताच्या सांगण्यानुसार, तुम्हाला पचनासंबंधित समस्या असतील तर रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा तूप खावे. यामुळे आतड्यांना ल्युब्रिकेशन मिळते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, ब्लोटिंगसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. याशिवाय तुम्ही गरम आमटी वा भाजीवर तूप १ चमचा घालून खाऊ शकता. दिवसातून साधारण 3-6 चमचे (लहान) तूप खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
[read_also content=”पाण्यात तूप घालून पिण्याचे फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/5-benefits-of-drinking-ghee-with-warm-water-in-morning-nrps-485819/”]
जेवणात किती तूप असावे?
वजन कमी करण्यास उपयुक्त
साधारणपणे लोकांना वाटतं की तूप खाल्ल्याने वजन वाढते, मात्र वास्तव याच्या उलट आहे. निर्धारित प्रमाणात तूप सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. वास्तविक, तुपात फॅट कमी करणारे ब्युटीरिक अॅसिड असते जे वजन कमी करण्यास मदत करते. तुम्ही जर मर्यादेपेक्षा अधिक तूप सेवन केले तर तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे वजनवाढ होऊ शकते. त्यामुळे दिवसात जितके तुमच्या शरीरासाठी योग्य आहे तितकेच तुपाचे सेवन करावे.
पचनाच्या समस्यांपासून आराम
बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंग अर्थात पोट फुगणे यासारख्या पचनाच्या समस्या असतील तर रोज एक चमचा तूप रिकाम्या पोटी खावे. सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. वास्तविक, रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने आपल्या आतड्यांना अन्न पचन व्यवस्थित करता येते. यामुळे पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
केस चमकदार होतील
नियमित तूप खाल्ल्याने केसांवरही सकारात्मक परिणाम होतो. तूप खाल्ल्याने तुमचे केस मऊ आणि चमकदार होतील. आता हे नक्की कसे असा जर तुम्ही विचार करत असाल तर, तुपात असलेले फॅटी ॲसिड केसांना नैसर्गिकरित्या कंडीशन करते. रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने केस गळणेही कमी होते. तसंच केसांना नैसर्गिक चमक मिळते.
[read_also content=”चेहऱ्याला तूप लावण्याचे फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/know-in-detail-the-beneficial-benefits-of-applying-ghee-on-the-face-tips-benefits-health-face-care-skin-tips-nrsk-527044/”]
त्वचेसाठीही फायदेशीर
तुम्हाला लवकर त्वचेवर म्हातारपण दिसू द्यायचे नसेल तर रोज किमान १ चमचा तुपाचे सेवन करावे. त्वचेला आवश्यक असणारे फॅटी ॲसिड तुपात आहे. याशिवाय रोज तूप खाल्ल्याने त्वचा हायड्रेटेड राहाते आणि त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येणे वा फाईन लाईन्सचा त्रास होत नाही. चमकदार त्वचा हवी असेल तर तुपाचा आपल्या डाएटमध्ये नक्की समावेश करून घ्या.