मूळतः मूग थंड गुणाचे असतात. मूग पचायला हलके आहेत. शरीराला आवश्यक असणारी ए, बी ही व्हिटामिन, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या टरफलात भरपूर प्रमाणात आहेत. मूग हिरवे, पिवळे, काळे तीन प्रकारचे असतात. यापैकी हिरवे मूग हे औषधी आणि गुणकारी मानले जातात. मूग कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारात फार उपयुक्त असतात. मुगाला मोड आणून खाण्याने मुगाची गुणवत्ता वाढते. तुरट व मधुर रस असलेले मूग थंड गुणाचे असतात. मूग पचायला हलके आहेत.
त्यामुळे मुगाचे जीवरक्षक म्हणून सांगितले जाणारे गुण टरफलासकट मुगात आहेत. मूग क्वचित पोटात वायू उत्पन्न करतात. मुगाबरोबर हिंग, मिरी वापरावी. मुगाचे पिठले, सबंध मूग कढण, उसळ, आमटी, पापड, लाडू, खीर अशा विविध प्रकारे मूग उपयुक्त पडतात. मुगाची खीचडी, मुगवडा, मुगाचे भजे, मुगपापड, मुगउसळ प्रचंड आवडीने लोक खातात.






